file 
नागपूर

शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...

सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि.नागपूर) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणांतर्गत "हाय रिस्क' रुग्ण शोधणे व सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षकांची सेवा घेऊन काम पूर्ण करण्यात आले. यासाठी खासगी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतू या शिक्षकांनी या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी नगरपरिषदेने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

आदेश मिळाल्यानंतरही होते गैरहजर
सर्वेक्षणाचे काम 29 एप्रिलपासून 2 जूनपर्यंत पूर्ण करण्यात आले. परंतु या शासकीय व अकस्मात आपत्ती कामासाठी आदेश मिळाल्यानंतरही शिक्षकांनी गैरहजर राहून शासकीय
आदेश व कायद्याचे उल्लंघन केले. अशा 10 शिक्षकांविरोधात कठोर भूमिका स्वीकारून वाडी नगरपरिषद प्रशासनाने 17 जूनला वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे वृत्त शिक्षण क्षेत्रात येताच खळबळ उडाली. वाडी पोलिसांनी आपत्ती कायद्यांतर्गत विशाखा सुभाष चानेकर, पल्लवी बंड, अशोक डोंगरकर, युवराज उमरेडकर, किशोर गळमाळे, हफिजा बेगम शेख, किशोर वानोडे, ज्योती पुरके, रजनी गोंगले, पंकज बांते या 10 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला.

अन्‌ कारणही सादर केले नाही
नगरपरिषदेचे कर्मचारी संदीप अढाऊ यांनी लेखी तक्रारीत सांगितले की, हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार जवळपास सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक, व्हॉट्‌सऍप, मोबाईल आदींच्या माध्यमातून कर्तव्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. परंतु हे शिक्षक हजरही राहिले नाही व गैरहजर राहण्याचे एकही योग्य कारण प्रशासनाकडे सादर केले नाही. शेवटी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई केली. वाडी नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर अशी कठोर कारवाई पहिल्यांदा दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT