After the death of her mother, sprinter Nikita won a bronze medal
After the death of her mother, sprinter Nikita won a bronze medal 
नागपूर

प्रेरणादायी! आईच्या निधनानंतरही धावपटू निकिताने जिंकले ब्रॉंझपदक; दुःख विसरून उतरली मैदानात

नरेंद्र चोरे

नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतच्या आईचे चार दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. आई गेल्याचे दुःख विसरून ती जिद्दीने मैदानावर उतरली आणि राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकून आईला श्रद्धांजली वाहिली.

रविवारी चंडीगड (पंजाब) येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे आई गेल्याचे दुःख आणि दुसरीकडे महत्त्वाची राष्ट्रीय स्पर्धा, अशा द्विधा मनःस्थितीत निकिता या स्पर्धेत उतरली आणि ब्रॉंझपदक जिंकून आपल्यातील खिलाडूवृत्तीचा परिचय दिला.

वेटरची मुलगी असलेल्या निकिताने हे पदक महिलांच्या दहा किमी शर्यतीत जिंकले. तिने दहा किमी अंतर ३७ मिनिटे १२.७१ सेकंदात पूर्ण केले. निकितानेही हे पदक आईच्या स्मृतीस अर्पण केले. 

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना निकिताने वरिष्ठ गटात मिळविलेले हे पहिलेच पदक होय. स्पर्धेत हरियानाच्या सोनिकाने सुवर्णपदक, तर नाशिकच्या कोमल जगदाळेने रौप्यपदकाची कमाई केली. नागपूरचीच आणखी एक आंतरराष्ट्रीय धावपटू प्राजक्ता गोडबोलेला १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर प्राजक्ताची चुलत बहिण प्राची २५ व्या स्थानावर राहिली.

मूळचा ट्रॅकस्टार क्लबचा खेळाडू असलेला व सध्या जबलपूर येथे सेनादलात कार्यरत असलेल्या विक्रम बंगेरियाने पुरुषांचा दहा किमी शर्यतीत रौप्यपदक जिंकले. रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या निकिताने २०१८-१९ मध्ये नोपोली (इटली) येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. महाराष्ट्र संघाने २० वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. या कामगिरीबद्दल जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी निकिता व अन्य खेळाडूंचे अभिनंदन केले.

आईने नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन दिले

आईच्या मृत्यूनंतर लगेच स्पर्धेत उतरणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मात्र, आईने मला नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच सर्व दुःख विसरून मी मैदानावर उतरू शकले, अशा शब्दांत निकिताने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT