After Pune Nagpur is now a major IT hub in the country 
नागपूर

‘ऑरेंज सिटी’त रुजले आयटी क्षेत्र; पुणेनंतर आता नागपूर देशातील एक प्रमुख ‘आयटी हब’

राजेश रामपूरकर

नागपूर : ‘ऑरेंज सिटी’त आयटी क्षेत्राची पाळेमुळे रुजली आहेत. पुणेनंतर आता नागपूर देशातील एक प्रमुख ‘आयटी हब’ म्हणून उदयास येत आहे. या क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ, संसाधने उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘आयटी हब’चा वेगाने विस्तार होत आहे. शहरात लहान मोठ्या १५० पेक्षा अधिक आयटी कंपन्या सध्या असून, १५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अंदाजे ६०० ते ७०० कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज असून येथील विकासाचे ‘सर्व्हर’ही वेगात चालत आहे.

हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांनी भारतातील आयटी क्षेत्राचा पाया रोवला. अमेरिकन कंपन्यांनी तेथे व्यवसाय सुरू केला. ही दोन शहरे म्हणजेच आयटी अशी ओळख निर्माण झाली होती. ती आजही कायम असली तरी तिथल्या आयटी व्यवसायाचे विकेंद्रीकरण होऊ लागले आहे. नव्वदीच्या दशकात; शेवटच्या काही वर्षांमध्ये आयटी कंपन्या आल्या. आयटी पार्कची संकल्पना अमलात आली.

नागपुरातील पहिला आयटी पार्क सदर भागात सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्याने शहरातील आयटी उद्योगाचा विकास होऊ लागला. आयटी कंपन्यांच्या व्यवसायाला उशिरा सुरुवात झाली असली तरी काही वर्षांत कंपन्यांच्या व्यवसायाचा आलेख चढताच आहे. सध्या लहान व मोठ्या साधारण २५० पेक्षा अधिक सॉफ्टवेअर कंपन्या असून, पंधरा हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

मिहानमध्ये काही कंपन्या सुरू आहेत. पर्सिस्टन्ट टेक्नॉलॉजीने मिहानमध्ये १३ एकर जागा घेतली आहे. एचसीएलने कंपनीचा विस्तार केला असून नवीन एक हजार कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. सध्या ५० एकर क्षेत्रात प्रकल्प आहे. भविष्यात १४० एकरमध्ये कंपनीचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.

या कंपन्यांद्वारे सुमारे ६०० ते ७०० कोटींचा व्यवसाय होत आहे. यातील सुमारे ५०० कोटींची उलाढाल ही निर्यातीवरच होते. सुमारे २०० कोटींचा व्यवसाय देशांतर्गत होतो. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रथम दोन महिने परिणाम झाला. मात्र, आता डीजिटल प्लॅटफॉर्मला पसंती मिळू लागल्याने कामे वाढली आहेत.

संत्रानगरीत कार्यरत कंपन्या

एचसीएल, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, ग्लोबोलॉजिक, विप्रो, इलामनचली, हेक्झावेअर, स्मार्ट डाटा एन्टरप्रायजेस, ताल कन्सल्टंसी, पर्सिस्टन्ट टेक्नॉलॉजीज, प्रिमिअर टेक्नॉलॉजी ग्रुप, झिऑन सोल्यूशन्स, कॅलिबर पॉईन्ट, सी-बे सिस्टिम्स, नोव्हाटेक, इन्फोसेप्ट, मायक्रो प्रो सॉफ्टवेअर, ई कॅलिबर, ट्रस्ट 

शहरासह विदर्भात चांगली इंजिनिअरिंग कॉलेजेस
आयटी कंपन्यांचे नागपूर येथे आकर्षित होण्याचे मुख्य कारण म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेले मनुष्यबळ होय. शहरासह विदर्भात अनेक चांगली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. बेंगळुरू, पुणे शहराच्या तुलनेने नागपूरचे राहणीमान स्वस्त आहे. आयटी विकासाच्या दृष्टीने हेदेखील अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.
- शिवशंकर,
उपाध्यक्ष, एचसीएल टेक्नॉलॉजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT