अजिंक्य दाताळकर
अजिंक्य दाताळकर e sakal
नागपूर

आता हवामानाविषयी मिळणार अचूक माहिती, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

नरेंद्र चोरे

नागपूर : हवामान विभागाने (meteorological department) वर्तविलेले अंदाज बऱ्याचवेळा खोटे ठरतात. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अशा शेतकऱ्यांसाठी नागपूरच्या २७ वर्षीय अजिंक्‍य दाताळकरने 'ऍग्रोल्‍ली' नावाचे अनोखे मोबाईल अॅप (agrolli app for farmers) विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाविषयीची अचूक माहिती तर मिळणार आहेच, शिवाय कोणती पिके घायची आणि शेतीचे कशाप्रकारे नियोजन करायचे, याविषयीचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हे स्टार्ट अप एकप्रकारे वरदानच ठरणार आहे.

बँक ऑफ महाराष्‍ट्रमध्‍ये कार्यरत सोनेगाव येथील विलास दाताळकर यांचा मुलगा असलेला अजिंक्य कम्‍प्‍युटर इंजिनीयर असून, सध्या तो अमेरिकेतील एका कंपनीत कार्यरत आहे. त्याने न्‍यूयॉर्क येथील पेस विद्यापीठातून मास्‍टर इन कम्‍प्‍युटर सायन्‍स हा अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. आयबीएम या आंतरराष्‍ट्रीय मल्‍टीटेक्‍नॉलॉजी कंपनीने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर 'कॉल फॉर कोड -२०२०' या मोबाईल अॅप्‍लीकेशन को‍डिंग स्‍पर्धेचे आयोजन केले हेाते. जगभरातील चार लाख स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत तल्लख बुद्धिमत्तेच्या अजिंक्‍यने २५ दिवसांहून कमी काळात तीन हजार लाइन्‍सचे कोडिंग करत आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार पटकाविला.

अजिंक्‍यचे हे अ‌ॅप दुष्काळाचा वारंवार सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. मशीन लर्निंगसारख्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्‍यात आलेल्या या अॅपमुळे शेतकऱ्यांना हवामानात होणाऱ्या बदलांविषयी अचूक माहिती मिळणार आहे. त्‍याआधारे शेतकऱ्यांना पीक पेरणीचा कालावधी ठरवणे सोपे जाणार आहे. हे अ‌ॅप गुगल प्‍लेस्‍टोअरवर खास शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. या अ‌ॅपमध्ये भारतातील तब्बल सात हजार गावांची माहिती आहे. या वैविध्यपूर्ण अॅपमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा अजिंक्‍यचा दावा आहे. मुलाच्या कामगिरीचा वडील विलास दाताळकर यांनाही अभिमान आहे.

शेतकऱ्यांसाठी एखादे अ‌ॅप तयार करण्याची कल्पना माझ्या डोक्यात अनेक दिवसांपासून फिरत होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेबद्दल कळल्यानंतर मी अ‌ॅप बनविण्याचा निर्णय घेतला. आवश्यक डेटा गोळा करून कामाला लागलो. सुरुवातीला मी स्वतःच मेहनत घेतली. त्यानंतर मशीन लर्निंगसाठी विविध देशातील माझ्या मित्रांनी मदत केली. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना या अ‌ॅपचा निश्चितच खूप फायदा होणार आहे.
-अजिंक्‍य दाताळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT