Alert ..! Opportunistic gangs are roaming in city
Alert ..! Opportunistic gangs are roaming in city 
नागपूर

सावधान..!वस्त्यांमध्ये फिरताहेत संधीसाधू टोळ्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे नागपूरकर घरात बंदिस्त आहेत. त्याचवेळी वस्त्यांमध्ये फिरून पैशांची मागणी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. व्याकुळलेल्या चेहऱ्यांसह भावनांचा अक्षरश: व्यापार या टोळ्यांनी मांडला आहे. शहरातील अनेक वस्त्यांमधून हा प्रकार सुरू असून नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिक घरातच तळ ठोकून आहेत. अशा कठीण काळातही काही संधीसाधू टोळ्या उपराजधानीच्या वस्त्यावस्त्यातून फिरून अनधिकृतपणे पैशांची वसुली करीत आहे. साधारणतः दुपारच्या वेळी घरातील मंडळी झोपलेली असतात. हीच संधी साधून टोळीचे सदस्य प्रामुख्याने महिला घरोघरी जातात. चेहऱ्यावर केविलवाणे भाव आणत पैशांची अडचण असल्याचे सांगून मदतीची विनंती करतात. परंतु, कोणी पैसे देण्यास नकार दिल्यास त्या आक्रमक होतात. दुषणे देत घरातील महिलांना भीती दाखवली जाते. भीतीपोटी कुणी जेवण किंवा अन्य साहित्य देण्याची तयारी दाखवतात. परंतु अशा वस्तूंना नकार देत पैशांची मागणी या सदस्यांकडून केली जाते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून साधारणता नंदनवन, गुरुदेवनगर, भांडे प्लॉट, धन्वंतरीनगर, रमणा मारोती अशा वस्त्यांमध्ये टोळीचे सदस्य फिरताना दिसत आहेत. 

पोषाखावरून ही मंडळी परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते. रखरखत्या उन्हात फिरणाऱ्या महिलांसोबत छोटी मुलेही असतात. मुलांचे हावभाव सुद्धा मनात दया निर्माण करणारे असतात. पण, प्रशिक्षण मिळाल्याप्रमाणे खान्या पिण्याच्या वस्तू दिल्यास सपशेल नकार देत पैशांची मागणी करतात. पैशांचा अनाठायी आग्रह संशय निर्माण करणारा आहे. यामुळेच परिसरातील नागरिक त्यांना परतवून लावत आहेत. पण, सर्वांसाठीच ही अडचणीची वेळ आहे. एकमेकांच्या साथीने मदतीनेच एकएक दिवस पुढे ढकलले जात आहे. गरजवंताच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. पण वस्त्यांमध्ये फिरणाऱ्या संधीसाधू टोळ्यांमुळे मदतीमागील भावणेलाच तडे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास गरजूंना मदतीपासून वंचित राहावे लागू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT