Mucormycosis Sakal
नागपूर

नागपुरात बुरशीवरील अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनच तुटवडा; रुग्णांना धोका

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनानंतर म्युकरमायकोसिस (Mucormycosis) अर्थात बुरशीच्या आजाराचे (Fungal diseases) थैमान सुरू झाले. या आजाराच्या रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र, आजारावर उपयोगी असलेल्या अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा तुटवडा (Lack of amphotericin-B injection) आहे. दररोज अडीच हजारांवर इंजेक्शनची गरज असताना नागपूर जिल्ह्यासाठी केवळ २०० ते ३०० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. यामुळे गंभीर रुग्णांना धोका (Risk to critical patients) निर्माण झाला आहे. (Amphotericin-B-injection-on-mucormycosis-is-scarce-in-Nagpur)

बुरशीच्या आजार असलेल्या एका रुग्णाला दररोज ५ अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन आवश्यकता असते. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात ३३३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण मेयो, मेडिकलसह विविध खासगी रुग्णालयात दाखल आहेत. बहुतांश रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका रुग्णाला दिवसाला ५ इंजेक्शन प्रमाणे दररोज २ हजार ५०० पेक्षा जास्त इंजेक्शन्स आवश्यक आहेत.

शुक्रवारनंतर इंजेक्शन आली नाहीत. दोन दिवसांपासून शहरात एकही अम्फोटेरिसिन-बीचे इंजेक्शन वितरण झाले नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांकडून आली आहे. मागणीनुसार पुरेसे इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रारही केली आहे. ज्या रुग्णालयांनी २०० ते ५०० इंजेक्शनची मागणी केली, त्यांना ४० ते ५० इंजेक्शन देऊन बोळवण केली जात असल्याचे उघड झाले आहे.

पर्यायी औषधांचा तुटवडा

इंजेक्शन्स उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर पॉझकोनाझोल आणि इसाव्यूकोनाझोल गोळ्या प्रिस्क्रिप्शनवर लिहून देत आहेत. मात्र, बुरशीच्या आजारावर प्रभावी असलेल्या या गोळ्या मिळत नाही. यामुळे पर्याय असलेल्या या औषधांचाही तुटवडा भासत आहे.

खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत इंजेक्शन्सचा पुरवठा होत आहे. इंजेक्शन्स येताच सर्व रुग्णालयांमधील रुग्णांच्या मागणीनुसार वितरण होत आहे. रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याने मागणी वाढली आहे.
- प्रशांत निकडे, अध्यक्ष, टास्क फोर्स

(Amphotericin-B-injection-on-mucormycosis-is-scarce-in-Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT