नागपूर

गॅंगस्टर रणजित सफेलकरवर आणखी एक गुन्हा; शेतकऱ्याचे शेत हडपले

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडाचा (Eknath Nimgade massacre) मास्टरमाईंड गॅंगस्टरवर रणजित सफेलकरच्या (Ranjit Safelkar) गळ्याभोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्‍ट होत चालला आहे. सफेलकरने एका शेतकऱ्याच्या मुलाचे अपहरण (Abduction of a farmer's son) केले. त्याच्या वडिलाला फोन करून शेताचा कब्जा सोडण्याची धमकी दिली. शेतकऱ्याने शेत देण्याची तयारी दर्शविताच मुलाला सोडून दिले. या प्रकरणी रणजित आणि हाटे या टोळीवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित हलके सफेलकर (५२, रा. कामठी), कालू नारायण हाटे, संजय आनंदराव धापोडकर (४३, रा. नागपूर), गुड्डू उर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर (३९), राकेश हरीशंकर गुप्ता (४३, रा. कामठी), नीलेश हेमंत ठाकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Another crime against gangster Ranjit Safelkar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २००८ ते १४ मे २०२१ दरम्यान ही घटना घडली. आजनी (बु) ता. कामठी येथील रवींद्र उर्फ रवी नत्थुजी घोडे (५०) यांचे ६ हेक्टर शेतजमीन आजनी-घोरपड मार्गावर आहे. रणजित व साथीदारांची या शेतीवर नजर गेली. ती जमीन हडपून प्लॉट पाडून बक्कळ पैसे कमविण्याचा कट रणजित सफेलकरने रचला. त्याने हाटे आणि धापोडकर बंधूंच्या टोळीला कट यशस्वी करण्याची जबाबदारी दिली.

रणजित सफेलकरने रवी घोडे व मुलाला ठार मारण्याची धमकी देत शेतजमीन जबरीने बळकावली. त्यासंदर्भात कोणतेही विक्रीपत्र किंवा करारनामा केला नाही. शेतजमीन हडप केल्यानंतर रणजितने त्यावर प्लॉट पाडून प्लॉटची इतरांना विक्री केली आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे घोडे यांची ९१ लाख रुपयांनी फसवणूक केली.

घोडे यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी देताच रणजितच्या साथीदारांनी घोडे यांचा मुलगा शुभम याचे अपहरण केले. त्याला ठार ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलाचा जीव जाईल या भीतीपोटी घोडे यांनी तक्रार दिली नाही. तसेच शेतीवर आल्यास शुभमला भरचौकात ठार करण्याची धमकीही रणजित सफेलकरने दिली होती.

काही दिवसांपूर्वी शहर गुन्हे शाखा पोलिसांनी ऑर्किटेक्ट एकनाथ निमगडे खूनप्रकरणात रणजित व त्याच्या साथीदारां अटक केली. त्याचप्रमाणे रणजितवर आणखी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे घोडे यांची हिंमत वाढली आणि त्यांनी शुक्रवारी शहर गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

सुपारी देणारा अजून गुलदस्त्यात

एकनाथ निमगडेंच्या विमानतळाजवळील भूखंडावर काही व्यापारी आणि राजकीय नेत्यांची नजर होती. त्यामुळे निमगडेंचा काटा दूर करणे गरजेचे होते. गँगस्टर रणजित सफेलकरला ५ कोटींची सुपारी देण्यात आली होती. रणजितला ५ कोटी रुपये कुणी दिले होते? याबाबतचे अद्यापही गुढ कायम आहे. राजकीय क्षेत्रातील मोठे नाव निमगडे हत्याकांडात येत असल्याची चर्चाही शहरात होती. स्मार्ट आणि हायटेक पोलिसांनी सुपारी देणाऱ्याचे नाव अद्याप कळू शकले नाही, हे विशेष.

(Another crime against gangster Ranjit Safelkar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT