Arun Gawli should surrender in five days
Arun Gawli should surrender in five days 
नागपूर

बस्सं... पाच दिवसांत गवळीने नागपूर कारागृहात शरण यावे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पाच दिवसांत नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच यापुढे पॅरोल रजा वाढवून मिळावी म्हणून याचिका स्वीकारली जाणार नाही, असेही नमूद केले. यापूर्वीच्या आदेशानुसार न्यायालयाने मुंबई येथील तळोजा कारागृहात गवळीला शरण जाण्याचे आदेश दिले होते. मात्र, कारागृह प्रशासनाने प्रवेश नाकारल्यामुळे गवळीने पुन्हा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. 

पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्याने 28 एप्रिल आणि 8 मे रोजी रजा वाढवून मिळावी या विनंतीसह न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती.

ही रजा संपत आल्याने गवळी याने 21 मे रोजी तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळत त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश दिले होते. मात्र, तळोजा कारागृहातील इतर कैद्यांना कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे गवळीला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला तळोजा प्रशासनाने दिला. 

त्यामुळे गवळीने रजा वाढवून मिळावी म्हणून शुक्रवारी (ता. 29) पुन्हा याचिका दाखल केली. न्यायालयाने रजा मंजूर न करता गवळीला चोवीस तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी, ती परवानगी एक दिवसात मंजूर करावी, त्यानंतर तीन दिवसांत गवळीने नागपूर गाठावे, असे आदेशात नमूद केले.

आता याचिका स्वीकारली जाणार नाही

तसेच यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT