athletes are practicing on roads having bad conditions  
नागपूर

हे काय! धावपटूंचे भविष्य धोक्यात; मातीगोट्यात करावा लागतो सराव.. मात्र काय आहे कारण

नरेंद्र चोरे

नागपूर : लॉकडाउनमुळे इन डोअरसह आउट डोअर सराव बंद आहे. त्यामुळे उपराजधानीतील धावपटूंना नाइलाजाने चिखलात व मातीगोट्यामध्ये सराव करावा लागत असल्याचे निराशाजनक चित्र सध्या जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रचंड त्रास होत असून, सर्व जण प्रशासनाच्या औपचारिक परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत.

मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यापासून बहुतांश खेळाडू आपापल्या घरांमध्ये कोंडलेले आहेत. तेव्हापासून त्यांचा सराव पूर्णपणे बंद आहे. लॉकडाउन उघडण्याची कसलीही चिन्हे दिसत नसल्यामुळे अनेक प्रशिक्षकांनी निवडक खेळाडूंना घेऊन हळूहळू सरावास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून रीतसर परवानगी नसल्यामुळे शहरातील सरासाची सर्वच मैदाने बंद आहेत. त्यामुळे नाइलाजाने त्यांना सरावासाठी रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जागोजागी चिखल, माती, गिट्टी व मुरूम आहे. चिखल तुडवतच सराव करताना खेळाडूंना चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोरोनामुळे प्राजक्ता गोडबोलेसारख्या आंतरराष्ट्रीय धावपटूच्या नशिबीही हे दिवस आले आहेत.

मैदानावर प्रवेशास मनाई 

सद्यःस्थितीत शहरातील काही प्रशिक्षक रेशीमबाग मैदानावर, काही ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर, तर काही प्रशिक्षक मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात खेळाडूंचा सराव घेताहेत. जय अॅथलेटिक्स अकादमीचे प्रशिक्षक डॉ. सुनील कापगते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर धावपटू घडवीत आहेत. मात्र, मैदानावर प्रवेशास मनाई असल्यामुळे त्यांना इकडून तिकडे सारखी भटकंती करावी लागत आहे. 

 शहराबाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही

ते आपल्या शिष्यांना कधी मोकळ्या रस्त्यावर, तर कधी गोधनी बोखारा परिसरातील डोंगराळ भागात नेऊन त्यांचे हातपाय मोकळे करीत आहेत. प्रशासनाने एका प्रशिक्षकाला केवळ सहा खेळाडूंसह सरावाची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे २५-३० खेळाडूंना एकाच वेळी सराव द्यायचा असेल, तर शहराबाहेर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून अधूनमधून खेळाडूंना निसर्गाच्या सान्निध्यात नेत असतो. पण, त्याच वेळी आवश्यक काळजीदेखील घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

या अटींवर परवानगी द्यावी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लवकरच सीझन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आउटडोअर खेळांना ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या अटींवर परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. कापगते यांनी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT