attendant demanded money while handing over the baby to relatives in nagpur gmc 
नागपूर

'पेढा-बर्फी नको, हिरवी नोट द्या', रुग्णालयात चिरीमिरी घेत बाळाला सोपविले जाते नातेवाईकांकडे

केवल जीवनतारे

नागपूर : घरात नवीन पाहुणा येणार म्हणून सारे कुटुंब आनंदी असते. अशातच बाळ जन्माला आल्याची 'वार्ता' सांगण्यासाठी मावशी रुग्णालयाच्या नातेवाइकांसमोर येते. घरात मुला-मुलींच्या रूपाने नवा पाहुणा आल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही आनंदाने पेढा किंवा बर्फी 'अटेंडंट' मावशीच्या हातावर ठेवतात. मात्र, अलिकडे बर्फी पेढ्याचा गोडवा कमी झाला. पेढा-बर्फी नको, हिरव्या नोटेचा प्रसाद ठेवा, असे हळूच नातेवाईकांच्या कानात गाणं गुणगुणल्यासारखं सांगण्यात येतं. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये हे चित्र दर दिवसाला अनुभवायला मिळते. मेडिकलमधील 'ओटी-जी' स्त्री व प्रसूतीरोगाशी संबंधित शस्त्रक्रियागारात बाळ जन्माला आल्यानंतर बाळ आणि बाळाच्या आईला वॉर्डात हलवण्यात येते. यावेळी मायलेकाला हलवताना बाळाची मुंह दिखाई म्हणून 'अटेंडंट'च्या हातवर पूर्वी आनंदाच्या भरात पेढा बर्फी ठेवली जात होती. येथे नातेवाईक पेढ्यांचा पॉकिटही आणून देतात. परंतु, अलिकडे लाडू, जिलबी किंवा पेढा बर्फी आणण्याच्या नातेवाइकांच्या या परंपरेला खीळ बसली आहे. आता मुलगा किंवा मुलगी झाली की, 'पेढा-बर्फी नको, हिरवी नोट द्या', अशी थेट मागणी करणारे 'अटेंडंट' मेडिकलमध्ये दिसतात. घरात मुला-मुलींच्या रूपाने नवा पाहुणा आल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही आनंदाने पाच-पन्नास नव्हे तर शंभर रुपये 'अटेंडंट'च्या हातावर ठेवतात. परंतु, ही एकप्रकारे चिरीमिरी असल्याची भावना एका नातेवाइकाने सकाळ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. ही छुप्या पद्धतीने घेतली जात असलेली भेट एकप्रकारे चिरीमिरी असल्यामुळे मेडिकल प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा होत असल्याची भावना नातेवाइकांकडून अलिकडे व्यक्त होत आहे. 

दररोज ४० बाळ येतात जन्माला - 
मेडिकलमध्ये दर दिवसाला सुमारे ४० ते ४५ बाळांचा जन्म होतो. एका बाळाच्या नातेवाइकांकडून शंभर रुपये घेतल्यास २४ तासांमध्ये ४ हजार रुपयांची चिरीमिरी घेतली जात असल्याचे गणितही या नातेवाइकाने सांगितले. अलिकडे एका हिरव्या नोटेने भागात नाही तर सोबतीला निळी नोट द्या, अशीही मागणी होत असल्याचे सांगण्यात येते. विशेष असे की, स्त्री व प्रसूती रोग वार्डात ड्युटी लावून घेण्यासाठी अर्थकारण गुंतले असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. यासंदर्भात मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीशांच्या १७ वर्षांच्या लेकानं मर्सिडीज चालवत दुचाकीला दिली धडक, एकाचा मृत्यू

‘आम्ही हिंदू आहोत, आमच्याकडे घटस्फोट होत नाही' कोमल रानी स्वर्णकारसोबत अफेअरवर गोविंदांने अखेर सोडलं मौन; म्हणाला...

Food Poisoning: महाप्रसादातून विषबाधा, गर्भवतीने बाळाला जन्म दिला पण दीड दिवसातच चिमुकल्याचा मृत्यू

Latest Marathi News Update : खालसा फायनान्स कंपनीच्या तिघांना घेतलं ताब्यात

Ichalkaranji Crime : पहाटे भांडले, पत्नीने झोपेच सोंग घेत पतीचा काटा काढला अन्; झोपून सकाळी मुलीसोबत पोलिस स्टेशन गाठलं, इचलकरंजीत धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT