aunty tries to kill his nephew by pushing him into a well 
नागपूर

भयंकर! काकूचा पुतणीलाच विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न, काय असाव कारण?

अनिल कांबळे

नागपूर : काकूच्या अनैतिक संबंधाची कुणकूण १५ वर्षांच्या पुतणीला लागली. तिने कुटुंबीयांना सांगून भंडाफोड करू नये म्हणून काकू व प्रियकराने पुतणीला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना नंदनवनमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काकूसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती (वय १५) ही आई-वडिलांसह नंदनवनमध्ये राहते. वडील दारूडे आहे तर आई गृहिणी आहे. ती संयुक्त कुटुंबात राहते. आरती दहावीची विद्यार्थिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून काकू योगिनी (३४) ही एका युवकाशी वारंवार बोलताना दिसत होती. तो युवक योगिनीचा प्रियकर असल्याची कुणकुण आरतीला लागली.

दोनदा काकूला प्रियकराशी बोलताना आरतीने पकडले होते. त्यामुळे योगिनी घाबरली होती. आरती हिने काकाला आणि कुटुंबीयांना सांगितल्यात मोठा घोळ होईल, अशी भीती योगिनीला होती. त्यामुळे तिने आणि तिच्या प्रियकराने आरतीचाच काटा काढण्याचा प्लान केला आणि पुढील घटना घडली.

अशी घडली घटना

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरती बाथरूमला जात होती. त्यावेळी योगिनी आणि तिचा प्रियकर घरासमोर बोलत बसले होते. दोघेही आरतीला दिसले. तिच्या काकूने आरतीच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केला. ती बेशुद्ध पडली. काकू आणि तिच्या प्रियकराने आरतीला घराच्या आवारात असलेल्या विहिरीत फेकले, असा आरोप आहे.

थोडक्यात बचावली आरती

विहिरीच्या खोल पाण्यात आरती गटांगळ्या खाऊ लागली. तिने आरडाओरड केला. आवाज ऐकून तिची आई घरातून बाहेर धावत आली. आरतीने मोटरच्या पाईपला पकडून ठेवले. शेजाऱ्यांच्या मदतीने आरतीला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तक्रारीनंतर नंदनवन पोलिस घरी पोहोचले. आरतीच्या बयाणावरून पोलिसांनी योगिनी व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT