शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रजेगाव येथे बाघ इटियाडोह विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी, म्हणून चार इमारती बांधल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतींची देखभाल संबंधित विभागाकडून केली जात होती.शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रजेगाव येथे  
नागपूर

बाघ इटियाडोहच्या इमारती बनल्या असामाजिक तत्त्वांचा अड्डा; नागरिकांना सहन करावा लागतो त्रास

महेश येडे

रावणवाडी (जि. गोंदिया) : रजेगाव येथील बाघ इटियाडोहच्या इमारतींच्या देखरेखीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. परिणामी, या इमारती मोडकळीस आल्या असून, असामाजिक तत्त्वांचा अधिक वावर वाढला आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रजेगाव येथे बाघ इटियाडोह विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी, म्हणून चार इमारती बांधल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतींची देखभाल संबंधित विभागाकडून केली जात होती. परंतु, सद्यःस्थितीत इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.   इमारतींचे दरवाजे तुटले आहेत. छत उखडून पडले आहेत. परिणामी, या इमारतींवर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केला आहे. दारूसह, तासपत्त्यांचा अड्डा बनला आहे. 

अमली पदार्थांचे सेवनही केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या इमारतींमध्ये सरपटणाऱ्या जीवजंतूंचाही वावर आहे. असे असले तरी, संबंधित विभागाचे इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांनीदेखील बनवला अड्डा

या एकट्या पडलेल्या इमारतींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील आपला जम बसविला आहे. सिगारेटसह अन्य नशाही त्यांच्याकडून केल्या जात असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे, एका इमारतीत बाघ इटियाडोहचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी कधी येतील, अन्‌ कधी निघून जातील, याचा नेम नाही

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT