baplek challenge trend on social media
baplek challenge trend on social media 
नागपूर

नथीच्या नखऱ्यानंतर आता 'बापलेक चॅलेंज', सोशल मीडियावर रंगतोय ट्रेंड

अनिल कांबळे

नागपूर : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड सुरू होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर 'बाप-लेक चॅलेंज' आणि 'मायलेक चॅलेंज' चा ट्रेंड सुरू आहे. अनेकजण आपल्या मुलांसह सोशल मीडियावर फोटो अपलोड करून हे चॅलेंज पूर्ण करीत आहेत. अशा फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंजचा ट्रेंड अनेकदा सुरू असतो. अशा ट्रेंडला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळतो. काही दिवसांपूर्वी 'नथीचा नखरा', 'खाकी चॅलेंज', 'साडी चॅलेंज',  'कुल वॉटर चॅलेंज', सिंगल चॅलेंज', 'कपल चॅलेंज' असा ट्रेंड होता. त्या ट्रेंडमुळे सोशल मीडियावर फोटोंचा पूर आला होता. महिलांनी तर नथ आणि वेगवेगळ्या साड्यांचे फोटो टाकून हौस पूर्ण केली होती. सध्या सोशल मीडियावर 'बाप-लेक चॅलेंज' आणि 'मायलेक चॅलेंज'चा ट्रेंड सुरू आहे. या चॅलेंजमध्ये अनेकजण आपल्या मुलांसह फोटो फेसबूक आणि ट्वीटरवर पोस्ट करीत आहेत. मुलांसोबत फोटो अपलोड करून ज्यांना चॅलेंज द्यायचे आहे, त्यांना तो टॅग करण्यात येतो. त्यांनतर तो टॅग झालेला व्यक्ती आपल्या मुलांसह फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चॅलेंज पूर्ण करतो. हे चॅलेंज मोठमोठे दिग्गज राजकीय पुढाऱ्यांपासून ते नोकरदार वर्गांपर्यंतचे लोक स्विकारत असून फेसबूकवर फोटो अपलोड करीत आहेत. त्यनिमित्ताने मुलांप्रती असलेले प्रेम किंवा पालकांची जबाबदारीची जाण होत असल्याचे चित्र आहे. 

'मायलेक चॅलेंज' भारी -
महिला आणि तरूणींमध्ये तर 'मायलेक चॅलेंज' हा ट्रेंड खूप भारी पडतोय. 'एक से बढकर एक' फोटो पोस्ट करण्याची तर स्पर्धाच सुरू आहे. आई आणि मुलीने तर 'साडी लूक'ला प्राधान्य दिले आहेत. नववारी, पातळ आणि पैठणीतील फोटोंनी धूम केली आहे. 

सायबर क्रिमिनल्सचा धोका -
आपल्या कुटुंबासह आपला फोटो पोस्ट केल्यानंतर भविष्यात प्रायव्हसी भंग होऊ शकते. तसेच आपला फोटो कॉपी करून बनावट अकाऊंट तयार होण्याची शक्यता असते. सायबर क्रिमिनल्स असे फेक अकाऊंट तयार करून खंडणी किंवा मदत म्हणून पैसे मागू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना या बाबींचा विचार करावा, असे मत सायबर तज्ज्ञ दीपक तर्हेकर यांनी व्यक्त केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT