file 
नागपूर

हे काय? मीटर काढण्यासाठी आलेल्या वीज अभियंत्यानांच मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि.नागपूर) : पातीमाता परिसरातील रेखचंद हरिचंद बोथरा यांच्याकडे अनेक दिवसांपासून वीज वितरण कंपनीचे थकित बिल असल्याने मीटर काढण्यासाठी गेलेल्या सहायक अभियंता प्रफुल्ल डोंगरे, कार्यालयीन कर्मचारी दिनेश हिरेयया सिंगवार, हितेश मोकाती, सुरेश सोनटक्‍के, जयंत कोडगुले, पुरुषोत्तम भोयर, राहुल नारनवरे, दिनाजी सातपैसे, शांती मळुळकर यांना वीजग्राहक बोथरा यांनी अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध
या प्रकरणात आरोपीविरोधात पारशिवनी पोलिसांत कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली असून, पारशिवनी पोलिसांनी आरोपीविरोधात शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे व शिवीगाळ करून मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल केला. आरोपी राहुल बोथरा अद्याप पसार आहे.मागील वर्षीपासून वीज मंडळाचे थकित बिल न भरल्याने आदेशाप्रमाने वीजमीटर काढण्याची कारवाई करीत असताना आरोपीने कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची व अश्‍लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सदस्य, अभियंते, कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी करीत आरोपीला अटक करण्याची मागणी रेटून धरली. यावेळी संपूर्ण परिसरातील वीज कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध करीत कामबंदचा पवित्रा घेतला. लागलीच पारशिवनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला लवकरच अटक करण्याची ग्वाही देण्यात आली.

मला खोट्या प्रकरणात फसविले जात आहे!
माझ्या घरी असलेले मीटर जलदगतीने फिरत असल्याने तसेच वीज देयके अधिकच येत होते. याबाबत वारंवार आवेदने, तक्रारी, भेटी देऊनही काहीच उपयोग होत नव्हता. मीटर बदल करण्यात यावा, याकरिता मागणी करूनही ते मीटर बदल करून देण्यात आले नाही. मला व माझ्या परिवाराला सतत त्रास देण्यात आला. याबाबत मुख्य अभियंता, तसेच ऊर्जामंत्र्यांनासुद्धा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांना आदेश देऊनही माझ्या समस्येचे निराकरण केले नाही. मी पैसे भरण्यासही तयार असताना येथील अधिका-यांना सूचना न देता मीटर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घेऊन आले. शिवीगाळ, धक्काबुक्की असा कुठलाच प्रकार झाला नसून निव्वळ जाणीवपूर्वक त्रास देऊन खोट्या प्रकरणात फसविल्या जात आहे. या विरोधात आम्हीही पारशिवनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून न्याय मागण्याची विनंती केली असल्याचे ग्राहक रेखचंद बोथरा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

SCROLL FOR NEXT