BJP did not consider splitting of votes in the elections
BJP did not consider splitting of votes in the elections 
नागपूर

मतविभाजन टळल्याने भाजपला पराभवाचा झटका; शेवटपर्यंत झाली नाही एकी

राजेश चरपे

नागपूर : एरवी अतिशय बारिक-सारिक गोष्टी विचारात घेऊन निवडणुकीचे नियोजन करणाऱ्या भाजपने यंदा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतविभाजनाचा विचार का केला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या मतांमध्ये असलेली तफावत बघता विभाजन टळल्याने भाजपचा पराभव झाल्याचे स्पष्ट होते.

भाजपच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने तर्क देत आहे. मात्र, मागील निवडणूक आणि यंदाच्या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी लक्षात घेता यावेळी रिपाइं मतांचे फारसे विभाजन झाले नसल्याचे दिसून येते. यापूर्वीच्या निवडणुकीत बसपच्या उमेदवारांनी जवळपास २० हजारांच्या घरात मते घेतली होती. वंजारी आणि जोशी यांच्या मतांमध्ये असलेला फरक जवळपास एवढाच आहे.

मागील निवडणुकीत बसपाचे उमेदवार असलेले सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी २१ हजार मते घेतली होती. त्यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे काँग्रेसचे उमेदवार होते. यावेळी बसपाने उमेदवारच दिला नाही.

वंचित बहुजन आघाडीसह रिपाइंच्या मतांवर दावा करणारे अनेक उमेदवार रिंगणात होते. वंचितच्या उमेदवाराला पाच हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही. त्या तुलनेत अतुलकुमार खोब्रागडे यांनी १२ हजार मते घेतली. उर्वरित एकी-बेकीची भाषा करणारे उमेदवार दीड हजाराच्या आतच निपटले.

बसपचा कॅडरबेस उमेदवार रिंगणात असता तर काँग्रेसला वीस-पंचेवीस हजारांच फटका निश्चितच बसला असता. बेकी संपवून एकीचा भाषा करणाऱ्यांची शेवटपर्यंत एकी झाली नाही. ही बाब भाजपला फायदेशीर ठरेल असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. बसपा कॅडरबेस पक्ष असल्याने त्यांची एकगठ्ठा मते पडतात. यावेळी उमेदवारचा नसल्याने बसपाची मते विखुरली.

ती नेमकी कोणाकडे गेली हे सांगता येत नसले तरी काँग्रेसला जी आघाडी मिळाली त्यात त्यांचाही वाटा नाकारता येत नाही. सुरुवातीला प्रशांत डेकाटे यांना समर्थन देण्यास नकार देणाऱ्या बसपाच्या काही स्थानिक नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात समर्थन दिले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. बसपाच्या कॅडरला शेवटपर्यंत डेकाटे हे बसपा समर्थीत उमेदवार आहेत हेसुद्धा माहीत नव्हते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT