Devendra Fadnavis  
नागपूर

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब! पोलिसांना धमकीचा फोन, कारण ऐकून बसेल धक्का!

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धकमी देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला याप्रकरणी धमकीचा फोन आला आहे. रात्री दोन वाजता हा फोन आल्याची माहिती साम टिव्हीने दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा रात्री तैणात करण्यात आला होता. धमकीचा फोन करणारा व्यक्ती कन्हान परिसरातील आहे. घरची लाईट गेली म्हणून संतापून त्याने पोलिसांना धमकीचा फोन केला आहे. 

दरम्यान नागपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रात्री दोन वाजता कंट्रोल रूमला फोन आला की उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवाला, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर हा फोन कट झाला. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क झाली. फडणवीस यांचे घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पूर्णपणे तपासणी केली. 

ज्या परिसरातून हा फोन आला होता. याची तपासणी देखील पोलिसांनी केली. कन्हान या भागातून हा फोन आला होता. चौकशी केली असता त्याच्या घरची लाईट गेली होती. म्हणून त्याने रागात हा फोने केल्याचे पोलिसांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT