नागपूर

‘म्युकरमायकोसिस’मुळे थांबला दोघांचा श्‍वास; कोरोनामुक्तीनंतरही घात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाच्या संसर्गाची आकडेवारी मे महिन्यात कमी होताना दिसत असली तरी कोरोनामुक्तीनंतर ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला आहे. आठवडाभरात म्युकरमायकोसिसमुळे दोघांचा श्‍वास थांबला. तर वैद्यकीय महाविद्यालयात आठ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Both died due to mucormycosis in Yavatmal district)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनावर मात केलेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतरच्या नवीन संकटावर मात करण्यासाठी तत्काळ निदान व उपचार करणे आवश्‍यक असल्याने रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी धाव घेत आहेत. कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

दुसरी लाट रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. एप्रिल महिन्यात बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी रुग्ण व नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागली. मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या रुग्णांना नवीनच संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता आणखी वाढली आहे. खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. वीस संशयित वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खासगीतही बाधितांवर उपचार केले जात आहे. म्युकरमायकोसिस हा आजार ‘म्युकर’नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी काळी नसते. मात्र, या बुरशीमुळे बाधित भागाचा रक्तपुरवठा बंद होतो व तो भाग मृत होतो. रक्तपुरवठा नसल्याने तो भाग काळा दिसतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशांना हा आजार आपल्या कवेत घेतो. कोरोनाबाधित रुग्ण, कॅन्सर रुग्ण, अवयव रोपण झालेले रुग्ण, अनियंत्रित रक्तातील साखर असणाऱ्या या रुग्णांना हा आजार व्हायची शक्‍यता जास्त असते.

कोरोना रुग्णांत म्युकरमायकोसिसचे प्रमाण जास्त आहे. कारण, कोरोनामध्ये रुग्णाच्या श्‍वसनमार्गाची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. शस्त्रक्रिया करून काळा झालेला भाग काढला जातो. या आजारावरील उपचाराचा खर्चही जास्त आहे. म्युकरमायकोसिसमुळे उद्‌भवणारा धोका टाळण्यासाठी रुग्ण कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहे. सध्या आठ बाधित रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनाप्रमाणेच म्युकरमायकोसिसचे दुखणे अंगावर न काढता वेळीच निदान करून उपचार घेणे आवश्‍यक आहे.
- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

जाणून घ्या लक्षणे

नाकातून काळ्या खपल्या पडणे व नाक कोरडे होणे, रक्तमीश्रित सर्दी येणे, गालावरची संवेदना बदलणे, टाळूवर जखम होणे व ते काळे पडणे, अचानक दात दुखणे व ढिले पडणे, चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर सूज येणे, डोकेदुखी व ताप, चेहरा वाकडा होणे, डोळे लाल होणे, डोळा दुखणे व नजर कमजोर होणे आदी लक्षणे आहेत.

(Both died due to mucormycosis in Yavatmal district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT