Brother in law of woman end life of her father in Nagpur Latest News  
नागपूर

जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

अनिल कांबळे

नागपूर ः  नागपुरात गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दोन बायकांचा दादला असलेल्या बापाने आपल्याच विवाहित मुलीवर बलात्कार केला. मुलीशी अश्‍लील चाळे करीत असतानाच महिलेच्या दिराने बघितले. त्याने रागाच्या भरात मित्राच्या मदतीने त्या नराधम बापाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खात्मा केला. ही थरारक घटना पिपळा फाट्याजवळ घडली. 

या हत्याकांडात पोलिसांनी दिरासह दोघांना अटक केली. जी. हिरालाल (वय ५५ रा. मूळ रा.हरमपूर, लखनऊ) असे मृतकाचे तर नितीन (वय २९) व त्याचा साथीदार राजू (वय ३४, सर्वांची नावे बदललेली) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल दारूडा असून त्याला दोन बायका आहेत. पहिल्या बायकोपासून त्याला सात मुली आणि दुसऱ्या बायकोपासून मुलगा आहे. हिरालाल याचे नातेवाइकही नागपुरातच राहतात. काही वर्षांपूर्वी हिरालालच्या मुलीचे नागपुरातील युवकासोबत लग्न झाले. गत एक महिन्यांपूर्वी हिरालाल नागपुरात आला. तो मुलीकडे राहायला लागला. दारू पिऊन आल्यानंतर तो ३५ वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करायला लागला. बापाच्या वागण्याचे मुलीला आश्‍चर्य वाटले. मात्र त्याने दारूच्या नशेत त्याने मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.   ती मुलगी मनातून खचली. वडीलाची किळस यायला लागली. वडीलाची तक्रार करावी तरी कुणाकडे? असा प्रश्‍न पडला. पती, दिर यांंना सांगितल्यास आपल्यावरही संशय येईल किंवा बापाचा मुडदा पडेल. या भीतीपोटी ती गप्प बसली. मात्र तिन दुसऱ्या दिवशी बापाला घरातून हाकलून दिले. 

पुन्हा केले अश्‍लील चाळे

हरीलाल हा काचेचे मंदिर बनवून विकण्याचा व्यवसाय करतो. तो पिपळा फाट्याजवळील एका झोपड्यात राहायला गेला. तो रविवारी रात्री आठ वाजता मुलीकडे जेवन करायला आला. दारूच्या नशेत असलेल्या हरीलालने जेवन केल्यानंतर पुन्हा मुलीशी अश्‍लील चाळे केले. मुलीने प्रतिकार करून बापाशी बाद घातला आणि बाहेर काढले. हरीलाल बडबड करीत आपल्या झोपडीकडे निघून गेला. 

झोपडीत घुसून केला खात्मा

वहिनीने बापाने केलेल्या कृत्याचा पाढा दिर नितीनसमोर वाचला. दोघांनीही हरीलालने केलेल्या कृत्याचा भयंकर राग आला. त्यामुळे नितीन आणि राजू दोघेही हिरालाल याच्या झोपडीत गेले. हिरालालही दारू प्यायला होती.दोघांनी त्याला काठीने मारहाण केली.यात त्याचा मृत्यू झाला. दोघे पसार झाले. एक नातेवाइक तेथे आला. त्याला हिरालाल मृतावस्थेत दिसला. त्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नितीन आणि राजूला अटक केली. हिरालाल हा नेमका कोणत्या प्रकारचा छळ करायचा, हे मुलीने सांगितले. तपासादरम्यान छळाचा प्रकार समोर येईल. आताच याबाबत ठोसपणे काही सांगता येणार नाही, असे हुडकेश्वर पोलिसांनी सांगितले.  

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT