file image canva
नागपूर

मैत्रिणीला फिरायला घेऊन जाणं पडलं महाग, तब्बल ६ लाखांचा गंडा

अनिल कांबळे

नागपूर : मैत्रिणीसह कॅब करून फिरायला जाणे एका मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाला (फार्मासिस्ट) चांगलेच महाग पडले. कॅबचालकाने फार्मासिस्टकडून पत्नीला सांगून बिंग फोडण्याची धमकी देऊन तब्बल सहा लाखांची खंडणी उकळली. तसेच पुन्हा खंडणीची मागणी करताना दोघांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार प्रतापनगरात उघडकीस आला. रोशन पुरुषोत्तम इंगळे (३०, कामठी रोड, सुमन विहार, नागपूर) आणि विकास मधूकर वाणी (३७, मोठा इंदोरा, मिसाळ लेआउट) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कन्हैयालाल जोशी (३६, त्रिमूर्तीनगर) यांचे प्रतापनगर चौकात मेडिकल स्टोअर आहे. ते जुलै २०१८ मध्ये एका मैत्रिणीसोबत पाटंगसावंगीला फिरायला गेले होते. फिरायला जाण्यासाठी आरोपी रोशन इंगळे याची कॅब भाड्याने केली होती. वेगवेगळ्या मंदिरांत देवदर्शन घेतल्यानंतर ते सायंकाळी पाटंगसावंगीतील एका लॉजवर गेले. तेथे दोघेही थकल्यामुळे थोडी विश्रांती घेऊन जेवण केले. लॉजमध्ये आराम करण्यासाठी रूम बुक करताना आशिष आणि त्यांची मैत्रिणीने आधारकार्डच्या झेरॉक्स जमा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी लॉज सोडताना आरोपी रोशन इंगळे याने दोघांचे आधारकार्ड, लॉजचे बिल स्वतःकडे घेतले. दोघांनाही प्रतापनगरात सोडून दिले आणि निघून गेला.

हेही वाचा - सेवाग्राम-सावंगी रुग्णालयात खाटा फुल्ल, वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली

सहा महिन्यांनंतर ब्लॅकमेलिंग

रोशनला फेब्रूवारी २०१९ ला आशिष जोशी यांना कॉल केला. ‘तुमचे आणि मैत्रिणीचे लॉजवरील बिल आणि आधारकार्ड माझ्याकडे आहेत. मला दीड लाख रुपये द्या. अन्यथा तुमच्या पत्नीला सांगून बिंग फोडेल’ अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी पैसे दिले. दोन महिन्यांनी पुन्हा दोन लाख रुपये मागितले. तसेच २०१९ च्या दिवाळीला एक लाख रुपये मागितले. एप्रिल २०२० मध्ये दीड लाख रुपये उकळले. अशाप्रकारे आतापर्यंत सहा लाख रुपये रोशनने उकळले.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

खंडणीच्या पैशातून घेतली कार

कॅबचालक रोशनने सहा लाख रुपये उकळून स्वतःसाठी कार खरेदी केली. तर कॅबवर विकास वाणी याला ड्रायव्हर ठेवले. रोशनला पुन्हा एक नवी कार घ्यायची होती. त्यासाठी त्याने आशिष जोशीला १३ एप्रिलला फोन केला. तीन लाखांची खंडणी मागितली. खंडणी देण्यासाठी तयारीसुद्धा दर्शविली. मात्र,पैशाची अडचण असल्यामुळे त्यांनी भावाकडे पैशाची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

Fathers Day Health Alert: फादर्स डे २०२६ ; आजचा पिता शांतपणे तणाव सहन करतोय, उच्च रक्तदाब ठरतोय मोठा आरोग्याचा धोका

Tech Tips : कुणीतरी गुपचुप तुमच्या चॅट किंवा फोटोचा स्क्रीनशॉट घेतय? ओळखायची खतरनाक ट्रिक, 90% लोकांना नाही माहिती

SCROLL FOR NEXT