Loksabha Election 2024 Vidharabha Esakal
नागपूर

Loksabha Election 2024: उमेदवारांचा सर्वांना जय श्रीराम! सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार, आता लक्ष मतदानाकडे

Vidharbha News: नागपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. देशाचे संविधान बदलणार नाही अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Loksabha Election 2024 Vidarbha:

रामनवमीचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांना जय श्रीराम केल्यानंतर बुधवारी (ता.१७) सायंकाळी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या सभा, बैठका, प्रचार यात्रा तसेच आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. एकमेकांच्या विरोधात तक्रारी, आरोप-प्रत्यारोप आतापर्यंत झाले आहेत. काही उमेदवार विकासासाठी तर काही रोजगारासाठी आपल्या मते देण्याची मागणी करीत आहेत. नागपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. देशाचे संविधान बदलणार नाही अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली.

दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नागपूरच्या सभेत संविधान बदलण्यासाठी भाजपचे चारशे पारचा नारा देत असल्याच आरोप केला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संविधान हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षाच्यावतीने रेटण्यात आला.

नागपूरमध्ये भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे. बसपाचा अपवाद वगळता एकाही राष्ट्रीय पक्षाचा मोठा उमेदवार रिंगणात नसल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. गडकरी आणि ठाकरे दररोज सकाळ आणि संध्याकाळी विधानसभानिहाय प्रचार यात्रा काढत आहेत.

रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे आणि महाघाडीचे श्यामकुमार बर्वे अशी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीने येथे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना समर्थन जाहीर केले आहे.

शंकर चहांदे यांना उमेदवारी देऊन माघार घ्यायला लावणारे, भाजपचे बंडखोर उमेदवार शंकर चहांदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. येथील लढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे नेते सुनील केदार अशी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची ‘दर्शन’ यात्रा

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रचार यात्रा काढणार आहेत. या दरम्यान ते वाटेतील सर्व राममंदिरांना भेटी देणार आहेत. या माध्यमातून ते मतदारांसोबत संपर्क साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT