Candidate of Gram Panchayat Election ended his life in Nagpur district  
नागपूर

निवडणुकीचा धुमधडाक्यात प्रचार करून आला घरी अन् काही वेळातच संपवलं जीवन;  गावात खळबळ

प्रवीण धांडे

कामठी (जि. नागपूर) : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.९) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे (२३, महालगाव) असे आहे.

सविस्तर वृत्त असे की, येत्या १५ जानेवारी रोजी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणुका होत असून त्यात महालगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक तीन (अ) मधून दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात प्रवीण भगवान धांडे व छत्रपती वसंतराव मुळे यांचा समावेश होता. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढत असताना अचानक यातील कांग्रेस समर्थीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण धांडे याने शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास राहत्या घरी बंद खोलीमध्ये जाऊन गळफास घेतला. प्रवीण दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या समर्थकासह वार्डात प्रचार करून दुपारी सव्वातीन वाजताचे सुमारास घरी आला व घरातील खोलीत गेला. दुपारी चार वाजता सुमारास आई खोलीत गेली असता प्रवीण छताला दोराने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. 

प्रवीणला बघून आईने एकच हंबरडा फोडून शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान मृतकला उपचारासाठी भवानी हॉस्पिटल नागपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले. पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत प्रवीण याचे वडील २०१० मध्ये महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. त्यांनीसुद्धा सरपंच असताना आत्महत्या केली होती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT