chandrashekhar bawankule latest Marathi news chandrashekhar bawankule latest Marathi news
नागपूर

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेने केसेस मागे घ्यायला हव्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बंडखोर आमदारांच्या निलंबनावर सोमवारी (ता. ११) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, यावरच सरकारचे भविष्य व मंत्रिमंडळाचा विस्तार अवलंबून आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने (supreme Court) शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश दिला आहे. यावर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेनेने (Shiv Sena) जनमताचा आदर करावा असे म्हटले आहे. (chandrashekhar bawankule latest Marathi news)

सुप्रीम कोर्टाने (supreme Court) दिलेल्या निर्णयानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेची (Shiv Sena) स्थिती केविलवाणी झाली आहे. विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड व बहुमत चाचणी झाली तेव्हा सरकारच्या बाजूने १६४ जणांनी मतदान केले. तेव्हाच शिवसेनेने सुप्रीम कोर्टात टाकलेल्या केसेस मागे घ्यायला हव्या होत्या, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारच्या बाजूने एवढे मोठे बहुमत असताना शिवसेनेने चिडून केसेस केल्या आहेत. मात्र, याचा काही उपयोग होणार नाही. कारण, बहुमत सरकारच्या बाजूने आहे. त्यामुळे या केसेस मागे घ्यावा आणि जनमताचा आदर करावा, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी होऊ शकत नाही. मंगळवारीही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेऊ नये असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेनेसंदर्भात वरील भाष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT