आमदार विकास ठाकरे सध्या शहराध्यक्ष आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे यांनी तयार केलेल्या कार्यकारिणीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. 
नागपूर

नागपुरात काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; नाना पटोलेंवर सर्वांच्या नजरा

राजेश चरपे

नागपूर  ः महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस शहराचा अध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिन्यात नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी संभाव्य नावांची चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते.

आमदार विकास ठाकरे सध्या शहराध्यक्ष आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे यांनी तयार केलेल्या कार्यकारिणीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून डावलण्यात आले होते. हा वाद तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहचला होता. मात्र त्यांनी जैस थे ची भूमिका घेतली. त्यामुळे नाराजी आणखीच वाढली. 

शेवटी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मोठे वादळ शहरात निर्माण झाले. चव्हाण यांना कार्यकर्त्यांचा रोषाला सामोरे जावे लागले. हसनबाग येथील जाहीर सभेत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यामुळे सतीश चतुर्वेदी यांनी अनेक महिन्यानंतर निलंबित करण्यात आले होते. या सर्व घडामोडींना चार वर्षे होऊ घातले आहे.

आता महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कार्यकर्ते सक्रिय होऊ लागले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या गटात कार्यरत आहे. तिकीट मिळेल याची कोणालाच शाश्वती नाही. त्यामुळे प्रत्येकजण सावध पाऊल टाकत आहे. अनेकजण गटबाजीचा ठप्प लागू नये म्हणून शांत बसला आहे. नाना पटोले यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केल्यास मोकळेपणा आणि उघडपणे काम करता येईल अशी त्यांची भावना आहे.

जबाबदारी कोण घेणार ?

नागपूर शहर काँग्रेसवर विकास ठाकरे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. त्यांना डावलणे सोपे नाही. मात्र ते आता आमदार आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्‍वावर शहराची जबाबदारी सोपवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. असे असले तरी सर्वांना चालणारा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला असता कोणीच कोणाचे नाव घ्यायला तयार नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT