नागपूर : उपराजधानीत 10 जून बुधवार रोजी एकाच वेळी 86 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले. तब्बल 21 दिवसांनंतर बुधवारी (ता.10) 73 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल नागपुरातील प्रयोगशाळेतून पुढे आला. विशेष असे की, मध्यवर्ती कारागृहातील कोरोनाचा ब्लास्ट झाला. तब्बल 44 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने शहरातील तिसरे मोठे हॉटस्पॉट म्हणून कारागृह उभे ठाकले आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा एकदम फुगला असून, 1578 वर पोहचला. आतापर्यंत 25 जण कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत.
आतापर्यंत एक-एक वस्ती कोरोनाच्या विळख्यात येत होती. आता सरकारी कार्यालयेदेखील कोरोनाच्या रडारवर आहेत. मध्यवर्ती कारागृह कोरोनाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी नकाशावर आले. सोमवारी कारागृहातील एक पोलिस बाधित आढळला. यानंतर दुसऱ्या दिवशी 10 जण बाधित झाले. तिसऱ्या दिवशी 44 जणांना कोरोना झाल्यामुळे येथील सारे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक बाधित झाल्याचे पुढे आले.
आता कारागृहातील बंदिवानदेखील कोरोनाच्या रडावर असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना आता जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शहरातील मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये जशी चाचण्यांची संख्या वाढली तशी कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. 594 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील 73 जण बाधित झाल्याचे पुढे आले.
शहरातील हे आहेत हॉटस्पॉट
कारागृह महासंचालकाकडून आलेल्या पत्रात कारागृहात लॉकडाऊन होण्यासाठी कर्मचाऱ्यांचा ऐच्छिक निर्णय असेल, असे स्पष्ट असतानादेखील अधीक्षक अनुप कुमरे यांनी कर्मचाऱ्यांना सक्ती करीत कारागृहात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करीत "स्टंटबाजी' केल्याची चर्चा आहे. काही महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक समस्या आणि आजारी असल्याचे कारण समोर करून लॉकडाऊन होण्यास असमर्थता दर्शविली होती. अशा कर्मचाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही. त्यामुळे अधीक्षकांचा आतातायीपणामुळे कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याची चर्चा आहे.
कारागृहातील कैदी आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारागृहात लॉकडाऊन झालेले कारागृह रक्षक नेहमीप्रमाण आपापल्या ड्युट्या करीत होते. एका ड्युटी रायटरलाही कोरोना झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी मस्टरवर सह्या मारण्यासाठी त्याच लिपिकाजवळ जात होते. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.