नागपूर

देवा... मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता रेऽऽ

नीलेश डाखोरे

नागपूर : जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे दोन अंग आहे. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ठरलेली असल्याने मृत्यू झाला नाही असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे मृत्यूची भीती बाळगून चिंता करण्याची आणि आपला आज खराब करण्याची काहीही गरज नाही. परंतु, कोरोनाने अनेकांना हिरावून घेतले आहे. घरच्या कर्त्या पुरुषाचेच निधन झाल्याने कसे जगायचे, हा प्रश्न उभा झाला आहे. यामुळेच ‘देवा... तू एवढा निष्ठुर का झाला’ असा प्रश्न मृतांचे नातेवाईक विचारत आहे. (Corona-made-darkness-in-the-homes-of-several-families)

कोरोनाच्या रूपात यम रुग्णालय व घराच्या दारासमोर उभा आहे. ‘आता खूप झाले. किती सूड घेणार आहे. थांबव हा मृत्यूचा जीवघेणा खेळ.’ असा आक्रोश अनेक कुटुंबाच्या घरी पाहायला मिळाला. राज्यावर कोरोनाच्या विषाणूने डंख मारला. सर्वत्र मृतदेहांचा ढीग पडला होता. मोक्षधामावर अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभे राहावे लागत होते. अख्खेच्या अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचे आपण या काळात बघितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुणी आई-वडील तर कुणी भाऊ-बहिणीला मुकले. कुणाच्या घरचा कर्ता पुरुषच मरण पावला. कुणाकडील चालता-फिरता माणूस मरण पावला. काहीही कळायच्या आत हे घडले. यामुळे कोरोनाचे नाव घेतले तरी शरीरावर शहारे निर्माण होते. कोरोना काळात मृत्यू फारच स्वस्त झाल्याचे दिसून आले.

आजारपणामुळे दीड वर्षांपूर्वी माझ्या मुलीचे निधन झाले. आठ महिन्यांपूर्वी दोन वर्षीय मुलाचे निमोनियाने निधन झाले. आता कोरोनाने पतीला माझ्यापासून हिरावून घेतले. आता मी कशी जगणार?, जगूनही काय करणार? कोरोनाने माझ्या कुटुंबालाच उद्ध्वस्त केले. असं काही होईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया दीपा वांढरे यांनी दिली. असा वाईट प्रसंग अनेकांवर ओढावला. त्याचा आपण विचारही करू शकत नाही. हे दुख फक्त परिचितांचे असल्याने समोर आले आहे.

कोणते पाप केले होते माझ्या वडिलांनी. कोणती चूक केली होती की त्यांना मृत्यूची शिक्षा दिली देवा... आमच्या घरचा आधारच हिरावून घेतला तुनी. निश्चित वेळेच्या अगोदरच वडिलांचा जीव घेतला रे.
- संदीप जयस्वाल, मताचा मुलगा
माझ्या मुलाला कोरोना झाला होता. त्याच्यावर योग्य उपचार व्हावे म्हणून रुग्णालयात दाखल केले. आठ दिवस तो रुग्णालयात होता. जवळपास अडीच लाखांचा खर्च झाला. मात्र, त्याच्या जीव वाचला नाही. आम्हा म्हाताऱ्या आई-वडिलांचा तो आधार होता. आमची काठीच देवाने तोडली.
- कांबळे कुटुंबीय, मृताचे आई-वडील
माझ्या वडिलांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. तब्बल १२ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होता. डॉक्टरांनी एक-दोन दिवसांत सुटी देऊ असेही म्हटले होते. मात्र, त्याची प्रकृती अचानक खराब झाली आणि त्यांच्या मृत्यू झाला. काहीही कळायच्या आत हे घडल्याने आमच्यावर मोठा आघात झाला आहे.
- अर्चना कांबळी, मृताची मुलगी
माझे पती चार दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सुटी दिली होती. पुन्हा प्रकृती खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यावेळी ते परत येऊ शकले नाही.
- योगिता देवरे, मृताची पत्नी

(Corona-made-darkness-in-the-homes-of-several-families)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT