नागपूर

कोरोनातून बरे होण्याचा दर ९५ टक्के; दिवसभरात ३६ मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर : फेब्रुवारीपासून जिल्ह्यात सुरू झालेली कोरोनाची दुसरी (coronavirus) लाट आता ओसरली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोप नागपूरने अनुभवला. मार्च ते एप्रिलमध्ये दररोज ८ हजार कोरोनाबाधित आढळून येत होते. बाधितांची संख्या घटली आणि कोरोनामुक्तांची संख्या वाढली. दरदिवसाला कोरोनातून बरे होण्याची सख्या वाढत असल्याने रिकव्हरी रेट वाढला (Recovery rate increased). कोरोतून बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर आला आहे. शनिवारी दिवसभरात नव्याने १ हजार ०८६ बाधितांची भर पडली आहे. तर २६ जणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. दिवसभरात बाधितांच्या तुलनेत तिप्पट २ हजार ८७२ जणांनी कोरोनाला हरवले. (Corona patient recovery rate is 95 percent)

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू असताना रिकव्हरी रेट ७६ वर आला होता. मात्र, आता कोरोनामुक्तांचा दर ९५ टक्क्यांवरून खाली उतरला. आज शहरातील १ हजार ३९३ व ग्रामीणमधील १ हजार ४७९ असे २ हजार ८७२ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ४६ हजार ३१ वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यातील १ ते २२ मे पर्यंतचा विचार केल्यास रिकव्हरी रेटमध्ये तब्बल १५.५२ टक्क्यांनी वाढ झाली. आज दिवसभरात शहरातील ७, ग्रामीणमधील ९ व जिल्ह्याबाहेरील १० अशा २६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. अलिकडे शहरातील मृतांपेक्षा ग्रामीण भागात मृत्यूचा टक्का वाढला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ७४४ वर पोहोचली आहे. यातील १ हजार ३१७ मृत हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.

शनिवारला शहरात १३ हजार ७२२ व ग्रामीणमध्ये ५ हजार ९१५ अशा जिल्ह्यात १९ हजार ६३७ चाचण्या झाल्या. १ हजार ०८६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यामध्ये शहरातील ४४५, ग्रामीण भागातील ६३१ व जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७० हजार १७ वर जाऊन पोहोचली आहे.

४ हजार ६०२ रुग्णांना लक्षणे

जिल्ह्यातील बाधितांची संख्या घटली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण सातत्यानेच वाढत आहे. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. २२ दिवसांपूर्वी ७७ हजारांवर असलेली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या पंधरा हजारांच्या घरात आहे. आजघडीला शहरात ८ हजार १९६ व ग्रामीणमध्ये ७ हजार ०४६ असे केवळ १५ हजार २४२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी तब्बल १० हजार ६४० जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ४ हजार ६०२ जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय, खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

(Corona patient recovery rate is 95 percent)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT