vijay vadettiwar vijay vadettiwar
नागपूर

‘ती आठवण मनात आणली की २० दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोनाने (coronavirus) पुन्हा डोकं वर काढले आहे. रोज वाढणारी रुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू शकतो. यापूर्वी आलेल्या लाटेपासून नागरिक काहीही शिकल्याचे दिसत नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेची आठवण जरी मनात आणून स्वत:वर नियंत्रण ठेवले तर १५ ते २० दिवसांत ही लाट नियंत्रणात येऊ शकते, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.

नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनावर (coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहे. लॉकडाऊन सरकारला लावायचा नाही. मात्र, नागरिकांनी स्वतःला आवरायला हवे. सरकारने निर्बंध कठोर केल्यानंतरही नागरिकांची बाजारात होणारी गर्दी कमी झालेली नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवायचा असेल तर स्वतः स्वतःवर निर्बंध लावणे गरजेचे आहे, असे विजय वडेट्टीवर (vijay wadettiwar) म्हणाले.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांमध्येही धडकी भरलेली आहे. मात्र, लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार सद्य तरी राज्य सरकारचा नाही. मात्र, नियंत्रण मिळविण्यासाठी नियम अधिक कठोर करावे लागतील. नियम कडक करण्यासंदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.

संक्रांतीनंतर नियंत्रण शक्य

आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध लादायला हवे. स्वतः काळजी घेतली तरच नियंत्रण मिळविणे शक्य आहे. संक्रांतीनंतर ही लाट कमी होईल अशी शक्यता आहे, असेही विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले. लोकलबाबत सद्य निर्णय नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. नाइट कर्फ्यू आवश्यक आहे. जेणेकरून समूह संसर्ग टाळता येईल, असेही विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, संजय लाखे पाटील; जरांगेंचे आंदोलन चुकीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT