The cost of a day of corona Patient is five thousand 
नागपूर

अबब... कोरोनाबाधिताचा एक दिवसाचा खर्च पाच हजार

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात एका कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी वगळता दररोज सुमारे पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णावर पूर्वी 15 दिवस उपचार केले जात होते. आता हा कालावधी 10 दिवसांवर आला. त्यामुळे गंभीर नसलेल्या रुग्णासाठी पूर्वी जवळपास 75 तर आता 50 हजार रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे.

उपराजधानीत चार शतकांकडे कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचत आहे. या खर्चाचा विचार करता मेयो आणि मेडिकलमध्ये या रुग्णांवर दहा दिवसांत सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. शहरात आतापर्यंत सुमारे 8 हजार चाचण्या झाल्या असून, यावर सुमारे 4 ते 5 कोटींचा खर्च झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका कोरोनाबाधित रुग्णाचे निदान करण्यावर सहा ते सात हजार रुपये खर्च होतात. यानंतर दर दिवसाला या रुग्णांसाठी आवश्‍यक उपचारातून कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनामार्फत मेयो-मेडिकलमध्ये प्रयत्न सुरू असतात.

मेडिकलमधील ट्रॉमा युनिटसह मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्‍सचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले. येथे सुमारे 1280 खाटा तयार होत आहेत. याशिवाय महापालिकेने 5 हजार खाटांचे कोविड सेंटर उभारले. कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यापूर्वी येथील कोरोना उपचार यंत्रणा सज्ज केली. यावर करोडोंचा खर्च करण्यात आला. आता रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल, मेयोतील आरोग्य यंत्रणेकडून उपचारासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यापासून तो बरा होईपर्यंत तर रुग्णवाहिकेतून थेट घरी सोडण्यापर्यंत खर्च केला जात आहे.

एका रुग्णावर रोज किमान 5 हजार रुपयांचा खर्च होत आहे. एका वरिष्ठ डॉक्‍टरने नाव न सांगण्याच्या अटीवर एका रुग्णासाठी रोज होणारा साधारण खर्चाचा किमान तपशील मांडला. त्यानुसार औषधावर एक ते दीड हजार रुपये खर्च होतो. दर दिवसाला एकाचवेळी वॉर्डात फिरताना एका रुग्णासाठी एक किटचा विचार करता, डॉक्‍टर, परिचारिकांच्या दोन पीपीई किटवर अडीच हजार रुपये खर्च होतात.

याशिवाय एन-95 मास्क, रुग्णाला सकाळची न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, असा एकूण साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. याशिवाय विविध चाचण्या, लिलन (बेडशीट), मनुष्यबळ, विजेचा खर्च रुग्णांच्या खर्चापासून दूर ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले. गंभीर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर मात्र ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरचा खर्च जास्त येतो. अशा गंभीर रुग्णांवर दर दिवसाला सुमारे 25 हजारांचा खर्च होत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना चाचणीचा खर्च


औषधी, पीपीई किट, मास्क हा खर्च पन्नास लाखांच्या आत आहे. परंतु, दर दिवसाला मेडिकल, मेयो, पशुवैद्यक, एम्स तसेच नीरी येथील पाच प्रयोगशाळांमध्ये सुमारे अडीचशेवर कोरोना चाचण्या होतात. आतापर्यंत उपराजधानीत सुमारे 8 हजार चाचण्याच पूर्ण झाल्या आहे. यावर सुमारे 4 कोटींचा खर्च झाला आहे. शासनाकडून मोफत उपचार केले जात आहेत. मात्र, यासाठी शासनातील प्रत्येक कर्मचाऱ्याला वेतन अदा करण्यात येते. हा खर्चाचा एक भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT