Amazon Company Kalamna Police Watch esakal
नागपूर

Nagpur Court : ग्राहकाला बनावट घड्याळ पाठवणं Amazon ला भोवलं, नागपूर कोर्टाने दिला दणका

ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीच्या (Amazon Company) चांगलेच अंगलट आले.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न केल्याने कलसी यांनी ॲमेझॉन आणि विक्रेत्या विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला.

नागपूर : ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीच्या (Amazon Company) चांगलेच अंगलट आले. या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने कळमना पोलिस ठाण्याला (Kalamna Police Station) ॲमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

परमजितसिंग कलसी यांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. दंडे यांनी या प्रकरणी निर्णय दिला. अर्जानुसार, कलसी यांनी ब्रँडेड कंपनीचे घड्याळ (Branded Watch) विकत घेण्यासाठी इंटरनेटवर शोधाशोध केली.

त्यांना आवडलेले १ हजार ८९८ रुपयांचे घड्याळ ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध दिसले. त्यावेळी स्विझरलँड येथील ब्रँडेड रेडो कंपनीच्या त्या घडाळ्याचे सुंदर-सुंदर फोटोसुद्धा त्यांना पाहायला मिळाले. कलसी यांच्याकडे ॲमेझॉनचे वार्षिक सबस्क्रीप्शन असल्याने १९ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पैसे जमा करीत त्यांनी ते घड्याळ ऑर्डर केले.

दिल्ली येथील एम के मार्केटिंगने ती ऑर्डर स्वीकारली. लागलीच २३ तारखेला त्यांना हे घड्याळ प्राप्त झाले. घड्याळ घेतल्याच्या उत्साहात मुलांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत ते पॅकेट उघडले. मात्र, ब्रँडेड ऐवजी सर्वसाधारण घड्याळ मिळाल्याने कलसी कुटुंबीयांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.

परंतु, पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न केल्याने कलसी यांनी ॲमेझॉन आणि विक्रेत्या विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने ॲमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, कळमना पोलिसांनी तपास करीत नियमानुसार अहवाल सादर करावा, असेही नमूद केले. कलसी यांच्यातर्फे ॲड. ए. एस. तिवारी यांनी बाजू मांडली.

लाखभराचे घड्याळ काही हजारात

सामान्यपणे कलसी यांनी ऑर्डर केलेल्या घड्याळाची किंमत एक लाख रुपयांच्या वर आहे. मात्र, ॲमेझॉनने याच घड्याळाचे चांगले चांगले फोटो दाखवत ते स्वस्त किमतीत देण्याचे कलसी यांना आमिष दिले, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय, घड्याळ ब्रँडेड असूनही त्या कंपनीचे वॉरंटी कार्डदेखील सोबत मिळाले नाही. मनस्ताप सहन करावा लागल्याने कलसी यांनी न्यायालयात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT