Covid-19 survey teacher died by corona 
नागपूर

अरेरे... कोवीड सर्वेक्षणात शिक्षक पाॅझिटिव्ह, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत, आता होतेय ही मागणी

अजय धर्मपुरीवार

हिंगणा  : कोवीड १९ सर्वेक्षणाच्या कामातील शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात रामदास काकडे (५१); या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १६) ला पहाटे ३.३० वाजतादरम्यान घडली. सर्वेक्षणाच्या कामात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा साधने न देताच काम केले जात असल्याने या शिक्षकाचा जिल्ह्यात सर्वेक्षणाच्या कामात पहिला बळी गेला आहे.
 
हिंगणा तालुक्यात कोवीड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र, याकडे नागपूर जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून शिक्षकांना कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या कामात बळजबरीने लावत आहे. डिगडोह येथील बालाजी हायस्कूलमध्ये रामदास काकडे शिक्षक कार्यरत होते. हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार संतोष खांडगे यांनी अनेक शिक्षकांना कोरोना  सर्वेक्षणाच्या कामात तैनात केले आहे.

जे शिक्षक सर्वेक्षणाचे काम करण्यास तयार नाही, अशा शिक्षकांना तहसीलदारांकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या आहे. यामुळे नोकरीच्या भीतीपोटी अनेक शिक्षक जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. रामदास काकडे यांची ड्युटी मागील दीड महिन्यापासून कोवीड सर्वेक्षणाच्या कामासाठी लावण्यात आली होती. त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साधने पुरवली गेली नाहीत. अशा परिस्थितीत दिलेल्या कार्यस्थळी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले.

यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. १२ सप्टेंबरपासून  ते लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. १६ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शासनाच्या यादीत कोरोना योध्दा म्हणूनही शिक्षकांचा समावेश नाही. तसेच ५० लाखाच्या विम्यासंदर्भातही शासनाकडून स्पष्टता नाही. अशा बिकट परिस्थितीत २० जुलैपासून नागपूर जिल्ह्यात कोवीड १९ सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यस्त आहे.

रामदास काकडेसुद्धा या सर्वेक्षणात सहभागी असताना गेल्या आठ त्यांची प्रकृती बरी नव्हती. यासंदर्भात हिंगणा तहसील यंत्रणेला कळविले होते, मात्र काम करावेच लागेल, असे फर्मान देण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

कोरोना सर्वेक्षणाचा काकडे नागपूर जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने काकडे कुटुंबीयांना कोवीड योध्दा अंतर्गत ५९ लाखांची मदत करावी व नागपूर जिल्ह्यातील कोवीड  सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी आता शिक्षकांमध्ये जोर धरत आहे.

शिक्षकांकडून बळजबरी काम

कोवीड सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांची नियुक्ती करू नये, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी खजांजी यांना देण्यात आले होते. शिक्षण उपसंचालकांनी सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना लावू नये, असे आदेश दिले आहेत. तरीही जिल्हा व  तालुका प्रशासनाकडून शिक्षकांकडून बळजबरी काम करून घेतले जात आहे. यामुळे शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून केली जाणार आहे.
अनिल गोतमारे
मुख्य समन्वयक नागपूर जिल्हा शिक्षण समिती
जिल्हा अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT