नागपूर

नागपूरकरांनो, दीक्षाभूमीवर ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू; बाह्यरुग्ण विभागाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान प्रसारित करणारी प्रयोगशाळा आहे. दीक्षाभूमीतून मानव भयमुक्त होतो. बंधमुक्‍त होतो. सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग देणाऱ्या दीक्षाभूमीवर कोरोना हरवण्यासाठी प्रतिबंधक उपचार करण्यासाठी खुली करून देण्यात येत आहे. दीक्षाभूमीवर कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. पन्नास खाटांचे कोविड केअर युनिट तयार झाले असून नुकतेच येथे बाह्यरुग्ण विभाग कोरोनाबाधितांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे.

धम्मक्रांतीची प्रेरणा देणाऱ्या या भूमीवर कोरोनावर मात करण्यासाठी अनेक डॉक्टरांनी सेवा देण्याचे कबुल केले आहे. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पुढाकाराने समता सैनिक दलाची मदत घेत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन झाले.

बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत रुग्ण तपासण्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रारंभ झाला असून स्मारक समिती, समता सैनिक दल आणि समता आरोग्य प्रतिष्ठानच्या मदतीने हा आरोग्याचा सेवाव्रती कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी माहिती समता सैनिक दलाचे सैनिक विश्वार पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. उपचार यंत्रणा कमी पडत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. समता सैनिक दलाच्या पुढाकाराने नागलोक येथे कोविड केअर सेंटर सुरू केले. आता दीक्षाभूमी येथेही सेंटर तयार करण्यात येत आहे. भन्दत नागार्जुन सुरई ससाई, स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझले, समता सैनिक दलाच्या सैनीक ॲड. स्मीता कांबळे, राजेश लांजेवार, ॲड. आकाश मून यांच्या परिश्रमातून हे सेंटर उभे झाले आहे. मंजुरी मिळतात खाटा व ऑक्सिजनच्या सेवा सूरू करून देण्यात येतील.
-विश्वास पाटील, सैनिक, समता सैनिक दल, नागपूर

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT