Saint Gajanan Maharaj
Saint Gajanan Maharaj 
नागपूर

Video : गण गण गणात बोते; पावणे दोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनेकांचे श्रद्धास्थान असलेले शेगावीचा राजा संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 16) त्रिमूर्तीनगर तलमले इस्टेट भागातील गजानन महाराज मंदिरातर्फे आयोजित महाप्रसादाचा पावणे दोन लाख भाविकांनी अस्वाद घेतला. तब्बल 18 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. महाप्रसाद सायंकाळी पाच ते रात्री 12 वाजेपर्यंत अविरत सुरू होता. 

नागपूर शहरातील भाविकांनी भक्तीभावानी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला. महाप्रसाद श्री सद्‌गुरू गजानन महाराज सेवाभावी मंडळातर्फे वाटप केला जात असला तरी भाविकांनी दिलेल्या धान्यांतून महाप्रसाद करण्यात येतो. यानिमित्ताने त्रिमूर्तीनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंडळाचे कार्यकर्ते अविरत सेवा देत होते. 

पश्‍चिम नागपुरातील त्रिमूर्तीनगर तलमले इस्टेट भागातील गजानन मंदिर शहरातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. तेथे आठवडाभरापासून महोत्सवाद्वारे प्रवचन, आख्यान व कीर्तन सुरू होते. प्रगटदिनाच्या दिवशी दुपारी चार वाजता शोभायात्रा काढण्यात आली. यात विदर्भासह मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यातून वारकरी व 800 भजनी मंडळे सहभागी झाले होते. 

मंडळाचे प्रमुख राजू तलमले यांच्या मार्गदर्शनात शोभायात्रा काढण्यात आली. अगदी साध्या सोहळ्यात पालखी काढण्यात आली. मंदिरातून नगरपरिक्रमेकरिता त्रिमूर्तीनगर चौक, पडोळे हॉस्पिटल चौक, गोपालनगरातून माटे चौक, दुर्गा मंदिर, प्रतापनगर चौक, राधे मंगलम हॉल, एनआयटी गार्डन मार्गे मंदिरात परत येणार आहे. 

वातावरण भक्तिमय

शोभायात्रेत देखाव्यांचे चित्ररथ, आदिवासी नृत्य आणि स्केंटिग करणारी लहान मुलेही सहभागी झाले होते. शोभायात्रेत काटोल, नरखेड, उमरेड, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या 800 दिंड्या, पालखी, भजनी मंडळे सहभागी होती. गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजाननाच्या नामघोषाने पश्‍चिम नागपुरातील वातावरण भक्तिमय झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT