Cyber criminals may fraud with you on name of Part Time Job  
नागपूर

इंटरनेटवर पार्टटाईम नोकरी शोधताय? जरा थांबा. आधी ही बातमी वाचा; होऊ शकते फसवणूक 

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि.वर्धा) : व्हॉट्‌स ऍपवर पार्ट टाइम नोकरीची ऑफर आली तर वेळीच सावधान व्हावे अन्यथा तुमचे बॅंक खाते रिकामे होण्याची शक्‍यता आहे. सध्या व्हॉटस ऍपद्वारे पैशाची ऑनलाइन देवान घेवाण केली जाते. याचा फायदा सायबर हॅकरने घेतला आहे. व्हॉट्‌सऍप हॅकरच्या निशाण्यावर आले आहे. सायबर पोलिसांकडून नागरिकांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

सायबर गुन्हेगार व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून वापर कर्त्याला विविध प्रलोभनाचे मेसेज पाठवत आहे. यात सध्या पार्टटाईम नोकरीच्या आफरचे मॅसेज व्हॉट्‌स ऍपवर पाठविले जात आहे. घरी आपल्या मोबाईल मधून पार्टटाइम नोकरी करून पैसे कमवू शकता अशा प्रकारचे प्रलोभन दाखवून हॅकर मेल पाठवतात. 

या लिंकवर क्‍लिक केल्यास मेलवर वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. या आधारे मोबाईलचा ताबा गुन्हेगार घेतात. या आधारे वापरकर्त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.

अशी घ्यावी खबरदारी

व्हॉट्‌स ऍपवर अथवा कुठल्याही मेसेजींग प्लॅटफार्मवर मेसेज आल्यास, ज्या नंबरवरुन मेसेज मिळाला आहे. तो नंबर त्वरित ब्लॉक करा. मॅसेज देखील हटवा जेणेकरून त्यात दिलेली लिंक चुकून ओपन होणार नाही.

अशी होते फसवणूक

बोगस मॅसेजचे लिंक नेहमीच व्हॉट्‌स ऍपवर येत असतात. हा व्हायरसचा एक प्रकार आहे. लिंकवर क्‍लिक केल्यावर युजरच्या फोन मध्ये इन्स्टॉल होते. नंतर युजर्स कडून इतर आर्थिक तपशील किंवा त्यांचा एटीएम पीन, कार्ड नंबर यासारख्या वैयक्तिक तपशिलासाठी विचारले जाते. नंतर हा डेटा बेकायदेशीर वापरला जातो.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT