Daughter raped by stepfather 
नागपूर

असा कसा बाप देवा लेकराला दिला; वासनांध बापाचे दुष्कृत्य आणि... 

अनिल कांबळे


नागपूर : सोळा वर्षीय मुलगी स्वीटी (बदललेले नाव) ही आईसह गणेशपेठमध्ये राहते. दहा वर्षांपूर्वी तिचे वडील सोडून गेले. त्यामुळे तिच्या आईने सहकारी मजूर असलेल्या उत्तम नावाच्या युवकाशी घरोबा केला. त्यावेळी मुलगी नऊ वर्षांची होती. उत्तमने मुलीचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली. यामुळे मुलीची आई व उत्तम पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. इथेच घात झाली आणि पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीपासून विभक्‍त झालेली महिला गणेशपेठमध्ये राहायला आली. तिच्यासोबत एक नऊ वर्षांची मुलगी होती. या महिलेवर उत्तमची नजर पडली. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्या मुलीचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली. यामुळे ते दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. 

कालांतराने मुलगी मोठी झाली. मुलगी 15 वर्षांची झाल्यावर उत्तमची नजर फिरली. तो तिच्यासोबत नेहमी अश्‍लील चाळे करीत होता. पत्नी घरी नसताना तिच्याशी लगट करीत होता. सप्टेंबर 2016 मध्ये पत्नी गावी गेली असता दोघे बाप-लेकंच घरी होते. रात्री अकरा वाजता उत्तम घरी आला. त्याने झोपेत असलेल्या मुलीला रूममध्ये बोलावले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, मुलीने नकार दिला. 

यामुळे चिडलेल्या उत्तमने तिला पट्टयाने मारहाण केली आणि बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. डिसेंबर 2019 पासून तो मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. पत्नी घरी नसताना सावत्र बाप मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्याने मुलीला वासनेची शिकार बनविले. 

बापाने सलग पाच महिने केलेल्या लैंगिक अत्याचारातून मुलगी गर्भवती झाली. यातून मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. पतीच्या या कृत्यामुळे अचडचणीत सापडलेल्या पत्नीने निर्णय घेऊन पोलिसांत तक्रार केली. गणेशपेठ पोलिसांनी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

गर्भपात करण्याचे ठरविले, पण... 


स्वीटीचे अचानक पोट दुखायला लागल्यामुळे तिला आईने मेयो रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी चेकपअ केले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच आईला धक्‍का बसला. मुलीसह ती घरी परतली. तिने मुलीला विचारले असता संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पत्नीने पतीला जाब विचारला. पतीने चूक झाल्याचे मान्य करीत माफी मागितली. तसेच मुलीचा गर्भपात करण्याचे ठरविले. मात्र, जास्त दिवस झाल्यामुळे गर्भपातही होऊ शकला नाही. 

गणेशपेठ पोलिसांत तक्रार 


स्विटीला 24 मार्च 2020 ला सकाळी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी तिने गोंडस बाळाला जन्म दिला. एकीकडे आई झाल्याच्या तिच्या चेहऱ्यावर आनंद होता तर दुसरीकडे मुलीच्या बाप म्हणून कुणाकडे बघायचे? असा प्रश्‍न उभा होता. तिच्या आईनेही डोक्‍यावर हात मारून घेत भविष्याबाबत चिंता व्यक्‍त केली. शेवटी दोघेही मायलेकीने गणेशपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत सावत्र वडीलाविरुद्ध बलात्काराचा तक्रार दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT