file photo 
नागपूर

नागरी वस्तीत शिरलेले चितळ सैरभैर झाले आणि...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमध्ये नागरिक घरात आणि वन्यप्राणी शहरात दिसत होते. आता अनलॉकच्या काळात मानवाची शहरातील वर्दळ वाढली असतानाही वन्यप्राणी गावात येऊ लागले असल्याचा अनुभव आज काटोल रोडवरील केसी अपार्टमेंटमध्ये आला. अंगावर ठिपके असलेले चितळ अचानक परिसरात शिरल्याने रहिवाशांना आश्‍चर्य वाटले. 

नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाजामुळे घाबरलेले चितळ सैरभर पळू लागल्याने सुरक्षाभिंत आणि जाळीवर जाऊन आदळले. यात गंभीर जखमी झाले. वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर चितळाचा मृत्यू झाला. काटोल रोडवर असलेल्या केसी अपार्टमेंटमध्ये अंगावर ठिपके असलेले एक चितळ सकाळीच शिरले. ते शेजारच्या गोरेवाडा जंगलातून आल्याची शक्‍यता आहे. 

अपार्टमेंटमध्ये घुसल्यानंतर नागरिकांनी हल्ला केल्याने चितळ घाबरले. बाहेर पडायला रस्ता शोधत पळू लागले. त्यात तो गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्याला पकडायला नागरिकांनीही प्रयत्न केले. अखेर वनविभागाला कळवल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला बंदिस्त केले. जखमी झालेल्या चितळावर उपचार करुन जंगलात सोडायचे असे ठरले, मात्र घाबरलेल्या चितळाचा धक्‍क्‍याने दुर्दैवी मृत्यू झाला. 
       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT