The decision to close the separation center was taken and corona spread 
नागपूर

विलगीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय भोवला; औषधांच्या दुकानासमोर लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचा मुक्त वावर

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाबाधितांचा वाढत्या प्रादुर्भावाने नागपूर कोरोनाचे हाटस्पॉट बनले होते. या महामारीने हजारो जीव घेतले. डिसेंबरपासून कोरोनाचे संक्रमण कमी होत गेले. मात्र, इतर शहराच्या तुलनेत आकडा फुगलेलाच आहे. शहरात तयार करण्यात आलेले विलगीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय चुकला आहे. तर गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचा शहरात असलेला मुक्तसंचार घातक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूसंख्येवर संपूर्ण नियंत्रण न आल्यामुळे केंद्रशासनाचे आरोग्य पथक नुकतेच धडकले होते. तत्कालीन महापालिका तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता तत्काळ विलगीकरण केंद्रे तयार करण्याचा सपाटा लावला होता.

वस्त्या या केंद्रात हलवल्या होत्या. यामुळे बाधितांच्या संख्येवर नियंत्रण होते. तर वस्त्यांमध्ये संक्रमण होण्यास उशीर लागत होता. हॉटस्पॉट भागातील बाधितांना विलगीकरणात ठेवण्याची योजना अतिशय प्रभावी ठरली. मात्र, कोरोना कमी होत गेल्याचे वातावरण तयार झाले आणि विलगीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला भोवला.

विलगीकरण गेले गृहविलगीकरण आले

विलगीकरण केंद्र बंद करण्यात आले. सामुदायिक प्रार्दुभाव झाल्यानतंरही विलगीकरणातील कोरोनाबाधितांवर योग्य उपचार झाले. या केंद्रावर उपचार मिळत होते. प्रकृती गंभीर झाली की, तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात सोडण्याची सोय होती. मात्र, कोरोनाचा कहर कमी होताच सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित रुग्णांसाठी हळूहळू गृहविलगीकरणाचा पर्याय सुरू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली.

विलगीकरण केंद्रात असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त संख्या गृहविलगीकरणात आहे. आजही २ हजारावर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांना थेट घरापर्यंत औषधे पोहचवली जात नाहीत. यामुळे खासगी डॉक्टरांकडे गेल्यानंतर हाती आलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरातील औषध दुकानासमोर उभे राहून औषध खरेदी करतात. या कोरोनाबाधितांचा मुक्तसंचार औषधालयासमोर असतो. लक्षणे नसलेले कोरोनाबाधित सर्रास मोठ्या हॉटेलसह उद्यानांमध्ये फिरत आहेत. यामुळे संक्रमणाची मोठी जोखीम आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थांबले

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर कुटुंबांसह त्याच्या संपर्कातील आलेल्या मित्र, नातेवाईक यांना शोधण्यात येत होता. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही थांबले. यामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येत नसल्याची भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातील किंवा मेयो, मेडिकलमधील डॉक्टरांकडून औषधांऐवजी केवळ सल्ला मिळतो आणि त्या कोरोनाबाधितांच्या हाती दिले जाते प्रिस्क्रिप्शन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT