dengue
dengue esakal
नागपूर

डेंगीचा हैदोस : २३ वर्षीय युवकाचा मृत्यू, मनपाकडे नाही नोंद

केवल जीवनतारे

नागपूर : जिल्ह्यासह शहरात डेंगीने वेगाने हातपाय पसरणे सुरू केले आहे. तथापि, महानगरपालिका याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. बुधवारी (ता. २२) ऋषभ गणवीर या २३ वर्षीय युवकाचा डेंगी आजाराने मृत्यू झाला. मनपाकडे या मृत्यूची नोंदच नाही. जिल्ह्यात आतापर्यंत दहा नागरिकांचा डेंगीने मृत्यू झाला आहे.

डेंगी नोटिफाईड आजार असूनही खासगी रुग्णालयात त्याची रीतसर नोंद होत नसल्याची चर्चा पसरली आहे. बुधवारी रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात बॅनर्जी ले-आऊट येथील युवक ऋषभ गणवीर याचा मृत्यू डेंगीने झाला. या मृत्यूची नोंदच नसल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग साथ आजारांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य संकट आहे. त्यात मलेरिया आणि स्वाइन फ्लूचेही संकट उभे ठाकले असताना डेंगीने तोंड वर काढले. एकट्या ऑगस्ट महिन्यात डेंगीचे विभागात १,३०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. नागपूर विभागात सात दिवसांत २१० डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. यातील पन्नास टक्के अर्थात ११४ जण नागपूर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात डेंगीचे १ हजार ८४६ रुग्ण आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये २ हजार ८९३ रुग्णांची नोंद झाली आहे. विभागातील एकूण मृत्यूसंख्या १७ आहे.

जिल्हा प्रशासन सुस्त

पूर्व विदर्भात सर्वाधिक डेंगीग्रस्त आढळून येत असताना जिल्हा प्रशासन मात्र सुस्त आहे. जिल्ह्यात १,८४६ डेंगीग्रस्त असून सर्वाधिक १,१११ रुग्ण ग्रामीण भागात आहेत. त्यातही कुही तालुक्यात सर्वाधिक २५५ तर नागपूर ग्रामीण १६३, भिवापूर तालुक्यात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी ४ डेंगीच्या रुग्णांची नोंद भिवापूर तालुक्यात झाली आहे.

जिल्हा डेंगीचे रुग्ण मृत्यू

  • नागपूर शहर ः ७३५ रुग्ण - ५ मृत्यू

  • नागपूर ग्रामीण ः ११११ रुग्ण - ५ मृत्यू

  • चंद्रपूर ः ४७६ रुग्ण - ४ मृत्यू

  • वर्धा ः ३६७ - रुग्ण - २ मृत्यू

  • गोंदिया ः १२२ रुग्ण - ० मृत्यू

  • भंडारा ः ४६ - रुग्ण - १ मृत्यू

  • गडचिरोली ः ३७ रुग्ण - ० मृत्यू

आकडे बोलतात…

  • २०१९ - १३१६ डेंगीचे रुग्ण -११ मृत्यू

  • २०२० - ५०३ डेंगीचे रुग्ण - २ मृत्यू

  • २०२१ - २८९३ डेंगीचे रुग्ण - ११ मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT