Dental college hostel on Corona's radar 
नागपूर

आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापकांपासून तर निवासी डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी तसेच सफाई कामगारासह सात जण कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले.

यामुळे दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. दंतचिकित्सकांच्या संपर्कातील 20च्या वर विद्यार्थ्यानी आम्हाला क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दिले, मात्र त्यांना अद्यापही क्वारंटाइन केले नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचा मुक्त वावर शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. यामुळे संपूर्ण वसतिगृह कोरोनाच्या रडावर आले आहे.

त्यातच दोन कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना मेडिकलमध्ये दाखल करून घेण्यास उशीर असल्याने दंतमध्ये थेट नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यासाठी आले. ते दोघे मुक्तपणे दंत रुग्णालयात फिरत होते, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासन मात्र तोंडावर बोट ठेवून चुप्पी साधून असल्याची चर्चा दंतच्या वर्तुळात पसरली आहे. 

दंत महाविद्यालयातील कोरोनाबाधित सहयोगी प्राध्यापकांना मेडिकलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना रक्तदाब असल्याची माहिती आहे. हे माहित असूनही प्रशासनाने कोरोनाच्या कामात गुंतविल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काही दंत चिकित्सक कोरोनाबाधित आले. यामुळे 20 च्या वर आंतरवासिता व इतर विद्यार्थ्यानी दंतमधील बाधितांच्या संपर्कात आल्याची कबुली दिली. यामुळे त्यांनी क्वारंटाइनची मागणी केली आहे. परंतु प्रशासनाकडून त्यांच्या क्वारंटाइनबाबत अद्यापही "ब्र' शब्द काढला गेला नसल्याचे सुत्रांनी कळविले. 

ते दोघे कोरोनाबाधित 
संशयीतांचे नमुने घेण्याच्या कार्यात मदत केल्याने कोरोनाबाधित झाले. यामुळे त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्याचा पर्याय पुढे आला. दरम्यान दिलेल्या सूचनांप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे त्यांनी भरती करण्यासंदर्भात विचारणा केली. मेडिकल प्रशासनाने "दंत प्रशासना'कडे बोट दाखवले. यामुळे दंतमधील ते दोघे बाधित दंतच्या नोडल अधिकारी यांच्याकडे विचारणा करण्यासाठी आले. त्या दोघांनी मिळून रुग्णालय पालथे घातले. त्यांना बघून दंतमधील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली. प्रशासन मात्र कोणताही निर्णय घेत नसल्याची जोरदार चर्चा येथे पसरली आहे. यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Stray Dog Attack : थरकाप उडवणारा व्हिडिओ! पुण्यात चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं, पण शेवटच्या क्षणी...

"बिग बॉसमध्ये मी एकतर कुणाला तरी मारेन किंवा..." चंद्रमुखी फेम अमृताने शो बद्दल मांडलं मत

Air India Office Snake Video : विलेपार्ले येथे एअर इंडिया कार्यालयात सात फूट लांबीचा साप आढळला अन्

Donald Trump Claim: भारत-पाक युद्ध मीच थांबवलं! ट्रम्प यांचा पुन्हा दावा; २००% टॅरिफची दाखवली भीती अन्...

IND vs SA, T20 WC: भारतीय संघ 'सुपर ८'मध्ये द. आफ्रिकेला चक्रावणारी स्ट्रॅटर्जी वापरणार; सूर्या असं करेल, याचा विचारच कुणी केला नसेल...

SCROLL FOR NEXT