Developed machines to check soil capacity and air pressure 
नागपूर

घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित

मंगेश गोमासे

नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे.

हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.

प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

काम सोपे, अचूक आणि वेगाने

प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते.

त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे.

पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

भन्नाट योजना! बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ११ महिने नोकरीपूर्व प्रशिक्षण; दरमहा मिळतील ६,००० ते १०,००० रुपये

आजचे राशिभविष्य - १८ मे २०२६

प्रोटीन, फायबर आणि चवीचा जबरदस्त कॉम्बो! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दुधी-चणा डाळ पराठा

SCROLL FOR NEXT