Devendra Fadanvis says Strict action should be taken against the culprits by immediate inquiry Bhandara Hospital Fire News
Devendra Fadanvis says Strict action should be taken against the culprits by immediate inquiry Bhandara Hospital Fire News 
नागपूर

(Video) Bhandara Hospital Fire News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली ही मागणी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे दहा बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे, असेही ते म्हणाले.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. घटनेची माहिती मिळताच अग्रिशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यासह देशभारत हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी जाऊन पाहणी करणार

फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचे नाही. मात्र, ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देवेंद्र फडणवीस नागपुरातून भंडाऱ्याकडे निघाले आहेत. तिथे ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT