Devendra Fadnavis Devendra Fadnavis
नागपूर

उपमुख्यमंत्री फडणवीस ओबीसींसाठी कुठली जादूची कांडी फिरवणार?

राजेश चरपे

नागपूर : महाविकास आघाडीच्या संथ कारभारामुळे ओबीसींचे आरक्षण गेले असा आरोप करणाऱ्या भाजपला आता आरक्षण मिळवून देण्यासाठी अवघड परीक्षा द्यावी लागणार आहे. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘भाजपच्या हाती सत्ता द्या एक महिन्याच्या आत आरक्षण मिळवून देतो’ असा दावा केला होता. तो खरा करण्याची संधी त्यांना आता मिळाली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) फेटाळून लावल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायची नाही असे जाहीर केले होते. मात्र, लगेच झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षाला याचा विसर पडला. सहानुभूती मिळवण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने सर्व उमेदवार ओबीसींचे देऊन वेळ मारून नेली होती.

इम्पेरिकल डेटा गोळा करायला उशीर केला, समर्पित आयोगाला निधी आणि मनुष्यबळ दिले नाही, महाविकास आघाडीलाच आरक्षण द्यायचे नाही असे आरोपही भाजपने (BJP) केले होते. माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस रोजच बाइट देऊन महाविकास आघाडीवर आरोप करीत होते. आता भाजपच्याच हातात राज्याची सत्ता आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) सुनावणी प्रलंबित आहे. आता देवेंद्र फडणवीस आपल्या भात्यातून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी कुठले अस्र उगारतात याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

बांठिया आयोगाच्या आडनावाकडे वेधले होते लक्ष

बांठिया आयोगाच्या आडनावावरून जात निश्चित करण्याच्या चुकीच्या पद्धतीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच लक्ष वेधले होते. नंतर ओबीसींचे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही ही चूक मान्य केली होती. बांठिया आयोगाला चुकीची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT