Dhoom of photos in police uniform on social media
Dhoom of photos in police uniform on social media 
नागपूर

नथीचा नखरा किंवा नऊवारी साडीतील फोटो नव्हे तर याचा आहे 'रूबाब'...

अनिल कांबळे

नागपूर : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू आहेत. त्यामध्ये विशेषतः "नथीचा नखरा..' "नवरा माझा नवसाचा...' "झुकी झुकी नजर..', "फोटो विथ सन-डॉटर', "फिर मुस्कुरायेगा इंडिया' आदींचा समावेश आहे. महिलांनी नववारी साडी नेसून नाकात नथ घालून तर कुणी नवऱ्यासोबत किंवा मुलासोबत फोटो वॉट्‌सऍप स्टेटसला ठेवून आपापली हौस पूर्ण करून घेतली. या ट्रेंडला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यातच कोरोनामुळे आता चोवीस तास बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही मोठा भाव खाल्ला आहे. त्यांच्याही कार्याची कुणीतरी दखल घ्यावी म्हणून सोशल मीडियावर "रूबाब वर्दीचा' ट्रेंड सुरू केला. या ट्रेंडची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. अनेकांनी या ट्रेंड आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

मन मोकळं करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाचा आधार घेतात. तर अनेक जण लिहिण्यासाठी प्लॅटफार्म म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. परंतु, आता नवीनच फॅड सोशल मीडियावर सुरू झाले आहे. वॉट्‌सऍपवर स्टेटस ठेवायचे आणि त्यातून कुणालातरी चॅलेंज द्यायचे. मित्र-मैत्रिणींना चॅलेंज देऊन छानसा फोटो स्टेटसला ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. अशातच "नथीचा नखरा' हॅशटॅगसह अनेकांनी सोशल मीडियावर चॅलेंज टाकले. एकामागून एक मुलींनी आणि महिलांनी नाकात नथ घालून असल्याचे फोटो काढण्याची हौस भागवून घेतली.

"झुकी झुकी नजर' या चॅलेंजमध्ये अनेकांनी विशेषतः तरुणींनी डोळ्यावर केसाची बट आणि चेहऱ्यावर "हल्की शी स्माईल' ठेवून काढलेल्या फोटोंनी वॉट्‌सऍप भरून गेले होते. मात्र, हा सर्व ट्रेंड सुरू असताना पोलिस विभागानेही आपला स्वतःचा ट्रेंड सुरू केला. "रूबाब खाकीचा'. 

उपराजधानीत पाहता-पाहता हा ट्रेंड एवढा चालत आहे की अनेक पोलिस कर्मचारी आणि महिला कर्मचारी आपला कडक खाकी वर्दीवरचा भारी फोटो स्टेटसला ठेवत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक महिला पोलिस कर्मचारी वर्दीत भारी रूबाबात फोटो वॉट्‌सऍपला डीपीसुद्धा ठेवत आहेत. सतत कोरोनाचा बंदोबस्त करून शरीराने आणि मनाने थकलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. "रूबाब वर्दीचा'या चॅलेंजमुळे सध्या उपराजधानीतील पोलिस मनोमन सुखावत आहेत.

मनातील इच्छा पूर्ण झाली
आम्हाला नेहमी वर्दीवर राहावे लागते. त्यामुळे नथीचा नखरा किंवा नऊवारी साडीत फोटो काढणे जमत नाही. ड्युटीमुळे तेवढा वेळही आमच्याकडे नसते. त्यामुळे आवड आणि उत्सुकता असूनही साडीवर फोटो काढू शकत नाही. मात्र, त्याची खंत नाही. अंगावर खाकी वर्दी चढविली की मान गर्वाने ताठ होते आणि कर्तव्यावर निघून जाताना अगदी उर भरून येतो. मात्र, आता "रूबाब वर्दीचा' या ट्रेंडमुळे मनातील इच्छा पूर्ण झाली. कडक खाकी वर्दीवर छानसा फोटो ठेवून हौस पूर्ण केली, याचे समाधान आणि आनंद आहे. 
- महिला पोलिस कर्मचारी

आमच्या खाकीवर आम्हाला अभिमान 
खाकी आमची शान आहे. आम्हाला कोणत्याही मेकअप किंवा भारीतल्या भारी सूटपेक्षा आमच्या खाकी वर्दीवर जास्त प्रेम आहे. त्यामुळे फक्‍त चॅलेंज म्हणून नव्हे तर आमच्या खाकीवर आम्हाला अभिमान आहे. डीपीवर मुलीचा फोटो ठेवला होता, परंतु "रूबाब वर्दीचा' या चॅलेंजमुळे कडक वर्दीवर फोटो ठेवला आहे. 
- सहायक पोलिस निरीक्षक (नागपूर पोलिस)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT