The director of Meditrina Dr A case has been registered against Paltewar 
नागपूर

वादग्रस्त हॉस्पिटल मेडिट्रीना; संचालक डॉ. पालतेवारावर गुन्हा दाखल; रुग्णांकडून केली आर्थिक लूट

अनिल कांबळे

नागपूर : रुग्णांकडून आर्थिक लूट करीत साफ्टवेअरमध्ये कमी बिल दर्शवून मेडिट्रीन हॉस्पिटल व्यवस्थापनाने पाच लाख ३६ हजार ४१५ रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मेडीट्रिना हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. समीर नारायण पालतेवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

१ एप्रिल २०१९ ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. या कालावधीत हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर डॉ. पालतेवार यांनी उपचार केले. त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. त्याचप्रमाणे २०२० साली कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्ण आले होते. त्यांच्यावर देखील त्यांनी उपचार केले होते. रुग्ण बरा झाल्यानंतर डॉ. पालतेवार यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. त्यांना तेवढ्याच रकमेच्या पावत्या दिल्या. परंतु, हॉस्पिटलच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी फेरफार करून बिलाची कमी रक्कम दाखविली.

हा प्रकार मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक गणेश रामचंद्र चक्करवार यांच्या लक्षात आले. त्यांनी सॉफ्टवेअरची तपासणी केली असता त्यात कमी रक्कम दाखविण्यात आली होती. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या लोकांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता रुग्णांकडून लाखो रुपये उकळल्याचे दिसून आले.

डॉ. पालतेवार यांनी दिलेल्या बिलाच्या पावत्याच चक्करवार यांच्यासमोर सादर केल्या. सध्या तीन रुग्ण समोर आले असून या तिघांकडूनही लाखो रुपये उकळून डॉ. पालतेवार यांनी ५ लाख ३६ हजार ४१५ रुपयांचा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चक्करवार यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये डॉ. पालतेवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही रुग्णांना बोलावून चौकशी केली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असून तपासात त्याचा उलगडा होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय उमेश बेसरकर पुढील तपास करीत आहे.

मेडिट्रीना हॉस्पिटल वादग्रस्त

२०१९ मध्ये सीताबर्डी पोलिस ठाण्यात डॉ. समीर पालतेवारवर गुन्हा दाखल केला होता. ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये बोगस रुग्ण दाखवून शासनाचे दोन कोटी रुपये लाटले होते. डॉ. पालतेवारने अनेक रुग्णांचे बोगस कागदपत्रे लावून मोठमोठी ऑपरेशन केल्याचे दाखवून शासनाकडून कोट्यवधींचे बिले काढले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT