Disputes arising from the construction of the wall 
नागपूर

भिंतीवरून मोठा वादंग. जाणून घ्या काय आहे प्रकरण...

योगेश बरवड

नागपूर : भिंतीच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादातून चर्च ऑफ नॉर्थ इंडिया समाज सेवा संस्था व लगतच्या व्यावसायिकांमध्ये मोठा वादंग निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर तोडफोडीसह धमकावल्याचे आरोप केले आहेत. परस्परांविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूरजनगर, गोरेवाडा रिंग रोड येथील रहिवासी आराधना उपाध्याय (47) या सदरच्या रेसिडेन्सी रोड येथील चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या समाजसेवी संस्थेच्या संचालिका आहेत. या संस्थेच्या अन्य संस्था असून त्यांच्यामार्फत सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. चर्चसमोरील काही दुकाने भाड्याने देण्यात आली आहेत. त्यातीलच एक फ्लोअर हाईट कॉफी कॅफे रेस्टॉरेंट गौतम ओमप्रकाश सिंह (30) रा. प्रशांतनगर यांच्या मालकीचे आहे. जागेच्या वापरावरून संस्थेचे पदाधिकारी व दुकानदारांमध्ये वाद आहे.

संस्थेकडून या भागात भिंतीचे बांधकाम करण्यात आले. पण, लगत दुकाने असणाऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला. उपाध्याय यांच्या तक्रारीनुसार दुकानदार गौतम सिंग, प्रशांत पत्राळकर, त्याची पत्नी व दोन मुली यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने गुरुवारी सकाळी नविन भिंत पाडून अश्‍लिल शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली. तसेच "किडनॅप करून मारून टाकीन, कोणाला माहीतही पडणार नाही', अशी धमकी दिली. 

गौतम सिंह यांच्या तक्रारीनुसार आराधना उपाध्याय, त्यांचे पती विश्वनाथ आणि 10 ते 12 साथीदारांनी रेस्टॉरेंटमध्ये बळजबरीने आत प्रवेश करून फिर्यादीला शिवीगाळ केली. सोबतच रेस्टॉरेंट मधील सामान बाहेर काढून तोडफोडकरून नुकसान केले. परस्परांविरोधातील तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT