Do corona vaccine test on my body 
नागपूर

Video : माझ्यावर करा कोरोना लसीची चाचणी, मुख्यमंत्र्यांना होमगार्डने लिहिले पत्र...

राजेश रामपूरकर

नागपूर : देशप्रेमाने झपाटलेल्या 39 वर्षीय नामदेव देवीदास खानझोडे यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक लस चाचणीसाठी आपले शरीर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. अशा प्रकारचा लेखी प्रस्ताव पाठविणारे खानझोडे देशातील पहिलेच असल्याची माहिती आहे. ते वर्धा येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होते. 

टाळेबंदीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी असला तरी कोरोनाच्या विळख्यातून अद्याप मुक्ती मिळालेली नाही. लस कधी तयार होणार? आणि ती हातात कधी येणार? यासाठी जगभरात जवळपास संशोधकांचे 80 वेगवेगळे गट संशोधन करीत आहेत. कोरोना वेगाने पसरत असल्याने लस येणे गरजेचे आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी त्यांच्या लसीचे प्रयोग मानवांवर करणे सुरू केले आहे. इंग्लंडमधील ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून माणसांवर या लसीचे प्रयोग सुरू आहेत. भारतात मात्र मानवावर प्रयोग करण्यात आलेला नाही. पुणे येथील सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाही अमेरिकेसोबत लस तयार करीत आहेत. भारतातही लस शोधण्याच्या चाचणीसाठी माझ्या शरीराचा वापर करावा. यातून देशसेवा घडेल आणि जनहितार्थ माझा जीव कामी लागेल असे खानझोडे यांचे म्हणणे आहे.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नामदेव खानझोडे यांना देशसेवेचे लहानपणापासूनच आकर्षण होते. काही कारणास्तव सैन्यात भरती होता आले नसले तरी होमगार्ड म्हणून देशसेवेचे काम करण्याचा निर्धार केला. तब्बल 20 वर्षांपूर्वी देशाची सेवा करण्याच्या हेतूने होमगार्डमध्ये रुजू झाले. या कालावधीत त्यांनी विविध निवडणुका, सणासुदीसह मोहरम आदी बंदोबस्तात नेहमीच देशप्रेमाच्या भावनेतून हातभार लावला. अल्पशा मानधनावर पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन 24 तास सेवा दिली. 

2016 मध्ये राज्य शासन व होमगार्ड महासमादेश कार्यालयाकडून होमगार्डवर अन्यायाची शृंखला सुरू झाली. त्याविरुद्ध आवाज उठवीत न्याय मागण्यासाठी मुंबई येथील होमगार्ड महासमादेश कार्यालय व शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यातून काही प्रमाणात दिलासाही मिळाला. 2018 मध्ये अन्यायाची शृंखला वाढत असल्याने वर्धा येथे महासमादेश कार्यालयाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

पोलिसांच्या मध्यस्थीने तो मागे घेण्यात आला. त्यानंतर नागपुरातील संविधान चौकात सलग 20 दिवस न्यायिक मार्गाने विविध आंदोलन करीत सरकारचे लक्ष्य वेधले. त्यावेळी सरकारने काही मागण्या मान्य केल्या. मात्र, आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल खानझोडे यांना होमगार्डमधून सेवामुक्त केले. देशसेवेपासून वंचित केल्याने आता खानझोडे यांनी राज्य सरकारला लेखी प्रस्ताव पाठवून स्वतःच्या शरीराचा उपयोग लसीच्या चाचणीसाठी करण्यात यावा असे म्हटले आहे. 

देशसेवा, जनहितार्थ शरीराचा उपयोग व्हावा 
जगभरात कोरोना विषाणूवर लस शोधली जात आहे. भारतातही त्यासाठी प्रयत्न केले जात असताना मानवी शरीरावर चाचणी होत असल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळेच देशसेवा आणि जनहितार्थ माझ्या शरीराचा उपयोग लसीच्या चाचणीसाठी व्हावा, हाच यामागील उद्देश आहे. 
- नामदेव खानझोडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT