do not gather at Dikshabhumi pray from home  
नागपूर

अनुयायांनो, दीक्षाभूमीवर गर्दी करू नका, घरीच करा बुद्धवंदना; स्मारक समितीचे आवाहन

राजेश चरपे

नागपूर ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवरील मुख्य धम्मदीक्षा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी न करता आपापल्या घरीच सकाळी नऊ वाजता बुद्धवंदना करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. यावेळी समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, अध्यक्ष भदन्त आर्य सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.

धम्मदीक्षा सोहळ्यासाठी संपूर्ण राज्य तसेच विदर्भातून लोक गाड्या करून येतात. यावर्षी मुख्य सोहळा रद्द झाल्यामुळे बौद्ध अनुयायांनी कोणत्याही प्रवासाची योजना आखू नये. दीक्षाभूमीचे दरवाजे बंद राहणार आहेत. तसेच उपराजधातील संघटनांनी रॅली काढू नये. कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली म्हणून यावर्षी दीक्षाभूमी स्तूपावर कोणतीही रोषणाई केली जाणार नाही, असे फुलझेले यांनी स्पष्ट केले.

२४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर स्मारक समिती सदस्यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी समता सैनिकदल मानवंदना देईल. २५ तारखेला सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात येईल. 

तर सकाळी ९ वाजता स्तूपाच्या आत भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यासह स्मारक समिती सदस्यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता भिक्खू संघातर्फे बुद्ध गाथांचे पठण करण्यात येणार आहे. त्याचे मराठी व हिंदीत भाषांतर करण्यात येईल.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Office Vandalised : नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाची तोडफोड; उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक; पाहा VIDEO

एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात रणवीर सिंग आणि रणबीर कपूर? बॉलिवूड अभिनेत्यानेच उघड केला आकडा

Viral Video: "अभिषेक आता माझा, तू त्याला बाबू का म्हणतेस?"; दोन तरुणींमध्ये तुफान राडा, केस पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Sangli Election : महाविकास आघाडीच्या पटावर रोज नवा डाव; शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय खलबते

Raigad Fort Traffic Issue : रायगड किल्ल्याला वाहतूक कोंडीचा विळखा, पर्यटक व स्थानिक त्रस्त

SCROLL FOR NEXT