doctor e sakal
नागपूर

डॉक्टरच खरे दवेदूत! पण, हल्ल्यांमुळे पडतेय समुपदेशनाची गरज

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जेथे सर्व आशा मावळतात, तेथे मात्र डॉक्‍टरांना (doctor's day 2021) देवदूताची उपमा दिली जाते. कोरोनाकाळात (coronavirus) हेच देव देव्हाऱ्यात नाही, तर रुग्णालयात पीपीई किटमध्ये कोरोनाशी लढताना दिसत होते. जीव वाचल्यानंतर डॉक्टरांच्या आभारासाठी जोडलेले हात त्यांचे देवपण नाकारत त्यांच्यावर वार करण्यास उठले. अशावेळी या देवदूतांच्या वेदनांशी कधी नाते जोडणारे? या देवमाणसांच्या मानसिक अवस्थांचे सकारात्मक ऑडिट हा समाज कधी करेल, असे प्रश्न निर्माण होत आहेत. (doctors day 2021 doctors also need of counseling in corona time)

शेवटच्या घटका मोजणाऱ्यांना जीवदान देणाऱ्या या माणसातील देवदूताबद्दल समाजात गैरसमज निर्माण झाले आहेत. आज ‘डॉक्टर डे’च्या पार्श्वभूमीवर काही निवडक डॉक्टरांशी चर्चा केली. महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होते. तरीदेखील राज्यात कोविड काळात मार्च २०२० पासून आतापर्यंत ६९ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. जीवनदान देणारे डॉक्टर या घटनांचे बळी ठरतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका मानसोपचारतज्ज्ञाने सात डॉक्टरांचे समुपदेशन करीत असल्याची माहिती दिली.

प्रत्येक घटनेकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी समाजामध्ये निर्माण झाल्यास डॉक्टरांना ऊर्जा मिळेल. डॉक्टरांना निर्भयतेने रुग्णसेवा करू दिल्यास कठीण प्रसंगावर मात करता येते. डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून ते जपले पाहिजे.
-डॉ. आनंद संचेती, हृदयरोगतज्ज्ञ, नागपूर.
७५ टक्के खासगी डॉक्टरांना प्रॅक्टिस करताना एकदा तरी मारहाणीच्या घटनेला सामोरे जावे लागेल. ६८ टक्के मारहाणीच्या घटना नातेवाईकांकडून झाल्या. ५० टक्के घटना आयसीयूसमोर झाल्या. नकारात्मक बदल समाजाला वेगळ्याच दिशेला घेऊन जातील.
-डॉ. वाय. एस. देशपांडे, माजी अध्यक्ष, आयएमए- महाराष्ट्र
मृत्यूच्या दारातील रुग्णांना जीवनदान देण्यासाठी डॉक्टर अंतिम क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करतात. कोरोनाकाळात पीपीई किटमध्ये जीव गुदमरत असताना रुग्णसेवेसाठी ते तैनात होते. मात्र, अनुचित घटना घडल्यानंतर डॉक्टरच टिकेचे धनी झाले. हे बरे नव्हे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.
एखादी अनुचित घटना घडली की, डॉक्टर वाईट ठरतो. कोरोनाकाळात २४ तास जिवाची पर्वा न करणाऱ्या योद्ध्यांवर हल्ले झाले. मात्र, समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
-डॉ. उदय बोधनकर, बालरोगतज्ज्ञ नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT