Don't impose district chief 
नागपूर

आतातरी जिल्हाप्रमुख लादू नका. निष्ठावंत शिवसैनिक का करत आहेत मागणी जाणून घ्या...

राजेश चरपे

नागपूर : मागील दहाबारा वर्षांतील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी काय केले, सध्या कोण सक्रिय आहेत, स्थानिक निवडणुकांमधील त्यांची कामगिरी काय होती? याचा लेखाजोखा घेऊनच नवा प्रमुख नेमण्यात यावा अशी मागणी निष्ठावंतांच्यावतीने केली जात आहे. केवळ मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात आहेत म्हणून जिल्हाप्रमुख लादल्यास शिवसेनेचे वाटोळे होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवेसनेचा आहे. त्यामुळे जनतेला शिवसेनेकडून मोठा अपेक्षा आहेत. जिल्ह्यात एकही आमदार शिवसेनेचा शिल्लक राहिला नाही. महापालिकेत फक्त दोन नगरसेवकांची पार्टी झाली आहे. याला कोण जबाबदार आहेत. कोणाच्या काळात ही अवस्था झाली. पुन्हा त्यांचीच नावे जिल्हाप्रमुखांसाठी चर्चेत असेल आणि त्यांच्याच नावाचा विचार केला जात असेल तर शिवसेनेला काय साध्य होणार, बदल करूनही काय फायदा होईल असाही सवाल शिवसैनिक उपस्थित करीत आहेत. 

सध्या जिल्हा प्रमुख म्हणून मंगेश काशीकर, सूरज गोजे, नितीन तिवारी, शेखर सावरबांधे यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी अनेक जण मुंबईतील नेत्यांचा संपर्कात आहेत. त्यांनी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे कळते. काशीकर यापूर्वी विभाग प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख होते. महापालिकेची निवडणूकही ते जिंकू शकले नाहीत. सावरबांधे सध्या फारसे सक्रिय नाहीत. नितीन तिवारी अलीकडेच शहर प्रमुख झाले आहेत. शिवाय मराठी-अमराठी वाद पुन्हा उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांची दोनच दिवासंपूर्वी शहराचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांचा विषय संपला आहे. विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर हे जाधवांचे पाठीराखे असतानाही त्यांचे पद गोठवले. शहर संपर्क प्रमुख नेमताना त्यांना विश्वासातही घेतले नाही. अशा परिस्थितीत कोणाचे वजन मातोश्रीवर चालते त्यानुसार जिल्हा प्रमुख ठरणार आहे. आजवर अशाच नियुक्त्या झाल्या आहेत. त्याचे काय झाले हेसुद्धा समोर आहे. त्यामुळे आता जिल्हाप्रमुख नेमताना खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: रुग्णवाहिका होती, पण चालक जेवायला गेला; वाशी स्थानकात तरुणाचा दुर्दैवी अंत, काय घडलं?

Pimpalgaon Jalal Toll Plaza : वाहनधारकांना मोठा दिलासा; १८ वर्षांनंतर मालेगाव-मनमाड-कोपरगाव हायवे टोलमुक्त

Latest Marathi News Live Update : बाणेरमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय उघड; व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा

Sangli Farmer : एक रुपयाची योजना बंद होताच रब्बी पीक विम्याला सांगलीत फटका; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी

Richest Temples India: भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान...कोणाकडे किती संपत्ती? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT