नागपूर

नागपुरात डबल मर्डर : पोलिसांच्या नाकावर टिच्चून शक्तिमानचा खून

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहराची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरात एका दिवसाआड खून होतच असतो. यामुळे पोलिसांसह शहराची महाराष्ट्रात चांगलीच बदनामी झाली. मात्र, येथील गुन्हेगारीवर पोलिसांना कोणतेही अंकुश आणता आलेले नाही. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अजनी परिसरात दोघांचा खून झाला. स्वयम नगराळे (वय २४) व शक्तिमान ऊर्फ शिवम् गुरुदेव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. यामुळे स्वतःला स्मार्ट म्हणवून घेणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Double-murder-in-Nagpur-Two-Killed-Nagpur-Crime-Question-marks-On-police-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरातील कौशल्यानगरात असलेल्या जुगार अड्ड्यावरून स्वयम व शक्तिमान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. याच वादातून स्वयमचा गेम करण्याचा निर्णय शक्तीमानने घेतला. शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शक्तिमान व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून स्वयम नगराळे याचा धारदार शस्त्राने खून केला.

स्वयमचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. खून झाल्याची माहिती मिळताच अजनी पोलिस, क्राईम ब्रांचने घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट (गुन्हेगारांचा शोध) राबविले. पोलिसांनी शक्तिमानच्या तिन्ही मित्रांना ताब्यात घेतले.

मात्र, शक्तिमान त्यांना मिळाला नाही. पोलिस त्याचा शोध घेत होते. यापूर्वीच स्वयमच्या मित्रांनी भांडे प्लॉटमधील शक्तीमानच्या मामाचे घर गाठून त्याला पकडले. त्याचे अपहरण करून जबरदस्ती आपल्या दुचाकीवर बसवले व स्वयमच्या ज्या ठिकाणी खून केला तेथे घेऊन गेले. स्वयमचा खून केल्यामुळे मित्रांनी शक्तिमानला मारहाण केली व नंतर त्याचाही खून केला.

पोलिसांच्या नाकावर टिचून खून

नागपुरात खुनाची घटना आता काही नवीन राहिलेले नाही. रोजच खून होते, अशीच स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मात्र, यावर पोलिसांचे कोणतेही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेले नाही. स्वयमचा खून झाल्यानंतर पोलिस परिसरातच आरोपींचा शोध घेत होते. असे असतानाही स्वयमच्या मित्रांनी शक्तिमानला खून केलेल्या ठिकाणी नेऊन त्याचा खून केला. पोलिसांच्या नाकावर टिचून खून झाल्याने मोठे प्रश्न निर्माण होत आहे.

(Double-murder-in-Nagpur-Two-Killed-Nagpur-Crime-Question-marks-On-police-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT