Dr. Nitin Raut will solve the problem of water scarcity 
नागपूर

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न लागणार मार्गी 

नीलेश डोये

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी यावर्षी १७३.५०० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत दिले. मागील वर्षाच्या तुलनेत आरक्षित पाण्याचे प्रमाण जास्त असून यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे ही बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांच्यासह महानगरपालिका व विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. 

नागपूर जिल्ह्यात ५ मोठे प्रकल्प व १२ मध्यम प्रकल्प तसेच ६० लघु प्रकल्प असे एकूण ७७ प्रकल्प आहेत. यावर्षी सर्व प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे मागणी केल्याप्रमाणे पुरवठा करता येईल का, अशी विचारणा या वेळी पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला केली.

सध्या जिल्ह्यातील ७७ प्रकल्पांच्या १७७७.७३ दलघमी प्रकल्पीय साठ्यापैकी मोठ्या पाच प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, बारा मध्यम प्रकल्पामध्ये १६०.०५ दलघमी, साठ लघु प्रकल्पामध्ये १२७.०५ दलघमी असे एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

उपलब्ध पाण्याची टक्केवारी ८९.५६ असल्याची माहिती अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी दिली. घरगुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी तसेच नदीवरून असणाऱ्या पाणीपुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

घरगुती व औद्योगिक पाणी मागणीच्या तुलनेत मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे संस्थानिहाय सर्व पाणी आरक्षण मंजूर करण्याबाबत पाटबंधारे विभागाने तयारी दर्शवली होती. त्यामुळे यावर्षी मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्येशी संबंधित प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

SCROLL FOR NEXT